Ganja
GanjaPudhari

Pune Airport Drug Smuggling: पुणे विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; बाथरूममधून 74.5 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बँकॉकहून आलेल्या विमानात लपवलेली 745 ग्रॅम अमलीपदार्थांची खेप कस्टम विभागाच्या कारवाईत उघड; मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू
Published on

पुणे: आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा एक धक्कादायक प्रकार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आला आहे. नुकत्याच गाजलेल्या ‌‘तस्कर‌’ वेबसीरिजमध्ये ज्याप्रमाणे विमानाचा वापर करून तस्करी दाखवली गेली होती, अगदी त्याच पद्धतीने बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानातून अमली पदार्थांची तस्करी केली जात होती.

Ganja
Maharashtra Onion Price Fall: युद्धाचा फटका कांद्याला; चाकण मार्केटमध्ये भाव कोसळले

मात्र, पुणे कस्टम विभागाच्या (सीमाशुल्क विभाग) एअर इंटेलिजन्स युनिटने कसून तपास करत विमानातील बाथरूममधून सुमारे 74.50 लाख रुपये किमतीचा 745 ग््रॉम हायड्रोपोनिक विड (गांजा) जप्त केला आहे.

Ganja
Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात; आई-मुलीचा मृत्यू, पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर

कशी झाली कारवाई?

बँकॉकहून पुण्यात आलेले एअर इंडिया एक्स्प्रेस (आयएक्स-241) हे विमान पुढे देशांतर्गत सेवा पुरवणार होते. याच अंतर्गत तांत्रिक गोष्टीचा (लूप होल) फायदा तस्करांनी घेण्याचे ठरवले होते. विमानातील बाथरूममधील टिश्यू कॅबिनेटच्या एका फायबर भागाचे स्क्रू काढून त्यामागील पोकळीत हा माल लपविण्यात आला होता. कस्टम अधिकाऱ्यांनी विमान लँड झाल्यानंतर केलेल्या तपासणीत पिवळ्या रंगाची दोन पाकिटे सापडली.

Ganja
Maharashtra Sahitya Parishad Election: महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक; दुबार मतदानाच्या पहिल्याच दिवशी 53 सभासदांचा सहभाग

या पाकिटांमध्ये व्हॅक्युम सीलबंद केलेली 8 छोटी पाकिटे सापडली. त्यात उच्च दर्जाचा ‌‘हायड्रोपोनिक गांजा‌’ भरलेला होता. दिनांक 3 मार्च 2026 रोजी कस्टम पुणे विभागाच्या पुणे विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यात सुमारे 74.50 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ॲक्ट 1985) अंतर्गत माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Ganja
Pune Couple Stuck In Dubai Gulf War: आखाती युद्धाचा फटका; पुण्यातील अर्चिटेक्ट दाम्पत्य दुबईत अडकले

तस्कर आता विमानाचाच वापर करून ड्रग्जची लपवाछपवी करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या लढवत आहेत. हे विमान बँकॉकहून पुण्यात आल्यानंतर देशांतर्गत प्रवासासाठी जाणार होते, याचाच फायदा घेऊन हा माल बाहेर काढण्याचा तस्करांचा डाव होता. मात्र, आमच्या टीमने तस्कर वेबसीरिजमधील मॉडस ऑपरेंडीसारखीच सतर्कता दाखवून विमानातील बाथरूमची झडती घेतली आणि ही तस्करी उधळून लावली. या साखळीतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा वेगाने काम करत आहेत.

डी. अनिल, प्रधान आयुक्त, सीमाशुल्क विभाग, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news