CET Registration Extension: बीबीए-बीसीएसह 7 अभ्यासक्रमांच्या CET नोंदणीस मुदतवाढ

18 मार्चपर्यंत अर्जाची संधी; परीक्षा 28 ते 30 एप्रिलदरम्यान होणार
CET
CETPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी.एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम ), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग््रेाटेड) / एमसीए (इंटिग््रेाटेड) या सात अभ्यासक्रमांच्या सीईटीची प्रवेशनोंदणी 4 मार्च 2026 पर्यंत होती. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशनोंदणीस 5 मार्च ते 18 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

CET
RTE Admission Rule: आरटीई प्रवेश नियमाविरोधात पुण्यात आंदोलन

या सात अभ्यासक्रमांना 56 हजार 723 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. 2025 च्या बी.एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 1 हजार 436 व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग््रेाटेड) / एमसीए (इंटिग््रेाटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 1 लाख 12 हजार 926 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

CET
Pune Airport Drug Smuggling: पुणे विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; बाथरूममधून 74.5 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

CET
Maharashtra Onion Price Fall: युद्धाचा फटका कांद्याला; चाकण मार्केटमध्ये भाव कोसळले

अपार आयडी व यूडीआयडी गरजेचे; पण बंधनकारक नाही

यावर्षीपासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे, यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‌‘ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (यूडीआयडी ) गरजेचे आहे.

CET
Baramati Accident: बारामतीत भीषण अपघात; आई-मुलीचा मृत्यू, पती व दोन वर्षांचा मुलगा गंभीर

पण, बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व यूडीआयडीची नोदणी करावी यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही त्यांनी तो डिजीलॉकरद्वारे तयार करावा. काही तांत्रिक कारणामुळे जर अपार आयडी व यूडीआयडी तयार न झालेल्या विद्यार्थ्यांनाही अपार आयडी व यूडीआयडीशिवाय सीईटीसाठी नोंदणी करता येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news