MBBS Admission Fraud: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक

चंद्रपूरच्या विद्यार्थिनीला जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष; बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
MBBS Admission Fraud
MBBS Admission FraudPudhari
Published on
Updated on

पुणे : जळगावच्‍या डॉक्‍टर उल्‍हास पाटील मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पीटलमध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी प्रवेश मिळवून देण्याच्‍या बहाण्याने तब्‍बल 1 कोटी 26 लाख 28 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी राजेश गुप्ता आणि ब्रिजेश आर्या यांच्यावर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत प्रवीण किशोर हलकरे (52, रा. सिव्‍हील वाॅर्ड, रामनगर, चंद्रपूर) यांनी दिलेल्‍या तक्रार दिली आहे.

MBBS Admission Fraud
Pune Municipal Election 2025: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत

तक्रारदार हे मूळचे चंद्रपूर येथील असून, त्‍यांचा टिव्‍ही व संगणक विक्रीचा व्यावसाय आहे. 1 नोव्‍हेंबरला त्‍यांनी व त्‍यांच्‍या पत्‍नी फेसबुकवर एमबीएसमे प्रवेश दिला जाईल अशा आशयाची जाहिरात वाचली. त्‍याच्‍या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा असल्‍याने त्‍यांनी दिलेल्‍या मोबाईल क्रमांकावर फोन केला. यावेळी राजेश गुप्‍ता याने त्‍यांना बाणेर येथील तेजस इटरनिटी , बालेवाडी फाटा येण्यास सांगितले.

MBBS Admission Fraud
CM Fadnavis Pune: मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर शहराशी जोडणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्‍यानंतर फिर्यादी हे मुलीच्‍या एमबीबीएसच्‍या ॲडमीशनसाठी गेले असता त्‍यावेळी राजेश गुप्ता व त्‍याच्‍या पार्टनर ब्रिजेश आर्या यांना ते भेटले. त्‍यांनी जळगावच्‍या डॉ. उल्‍हास पाटील मेडीकल कॉलेज ॲण्ड हॉस्पीटमध्ये ॲडमीशन करून देतो असे सांगितले. त्‍यांनी डोनेशनसाठी 35 लाख रूपये लागती असे सांगिती. तसेच तुम्‍हाला हप्‍तेवारी पेमेंटीची सुविधा करून देतो असेही आमिष आरोपींनी तक्रारदरांना दाखविले. मुलीचे ॲडमीशन एमबीबीएसला होईल या आशेने तक्रारदार यांनी आरोपींच्‍या कार्यालयात तीन लाखांचा धनादेश दिला. त्‍यानंतर त्‍यांना लेटरहेडसह शिक्‍यासह तयार केलेले पत्र मिळाले.

MBBS Admission Fraud
Pune Development Projects: मगरपट्टा–भैरोबा नाला पूल पाडून नव्याने उभारणार; मेट्रोसाठी मोठा निर्णय

त्‍यानंतर त्‍यांना जळगाव येथे येताना सात लाख रूपये घेऊन या असे सांगितले. त्‍यानंतर आरोपी दोघांनी 6 डिसेंबर रोजी त्‍यांनी मुलीच्‍या वैद्यकीय पदवीधन एमबीएसच्‍या ॲडमिशनकरीता बोलावून घेऊन उर्वरीत 7 लाख रूपये घेऊन आले का व तुम्‍ही जळगावच्‍या कोणत्‍या हॉटेलमध्ये थांबलात याचा पत्‍ता पाठवा अशी मागणी केली. दोघेही आरोपी तक्रारदार थांबलेल्‍या हॉटेलच्‍या ठिकाणी गेले. तसेच त्‍यांनी जळगावच्‍या मेडीकल कॉलेजचा फॉर्म देखील सोबत आणला. त्‍यावर आरोपींनी मुलीची सही घेतली.

MBBS Admission Fraud
Jewellery Theft Pune: घरकाम करणाऱ्या महिलांकडून २० लाखांचे दागिने लंपास

त्‍यावर तिचा फोटो लावला. त्‍यांनी दुसऱ्या दिवशी ते जळगावच्‍या कालेजमध्ये गेले तेथेही आरोपींनी दहा लाख रूपये घेतले. तसेच वेळोवेळी बाणेर येथील 65 लाख रूपये घेतले. असे वेळोवेळी आरोपींनी त्‍यांच्‍याकडून 1 कोटी 26 लाख उकळले. तसेच कोठेही ॲडमीशन न देता फसवणूक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news