Jewellery Theft Pune: घरकाम करणाऱ्या महिलांकडून २० लाखांचे दागिने लंपास

सॅलिसबरी पार्कमधील ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी; तिघींविरुद्ध गुन्हा दाखल
Jewellery Theft Pune
Jewellery Theft PunePudhari
Published on
Updated on

पुणे : घरकाम करणाऱ्या महिलांनी ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी केल्‍याची घटना सॅलिसबरी पार्क भागात घडली. याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jewellery Theft Pune
Junnar Leopard Attack: जुन्नर तालुक्यात बिबट्याचा हल्ला; आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

याबाबत एका डॉक्टर महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६१ वर्षीय डॉक्टर महिला कोंढव्यातील उंड्री भागात राहायला आहेत. त्यांची आई सॅलिसबरी पार्क भागातील गिडनी पार्क येथे राहायला आहे.

Jewellery Theft Pune
Pune Zilla Parishad Skill Labs: जिल्हा परिषद शाळांमध्ये 130 कौशल्याधारित प्रयोगशाळा उभारणार

त्यांच्या आईच्या घरात तीन महिला कामाला होत्या. त्यांच्या आईचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. घरकाम करणाऱ्या महिलांनी दागिने चोरल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news