नवी सांगवी : डोरेमॉन, रॉकेट, चंद्रयान राख्यांनी सजली बाजारपेठ

नवी सांगवी : डोरेमॉन, रॉकेट, चंद्रयान राख्यांनी सजली बाजारपेठ

नवी सांगवी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक राख्या विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. राख्या खरेदीसाठी महिलांची, युवतींची सध्या लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

राजस्थानी लुंबा राखीला पसंती

यंदाच्या वर्षी बाजारपेठेतील दुकानांमध्ये विविध रंगी व आकर्षक राख्यांच्या डिझाईन पाहायला मिळत आहेत. दुकानांमध्ये कुंदनच्या रंगीत खड्याच्या राख्या साठ ते दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. इतर राख्या दहा रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत असलेले पाहायला मिळतात. चंदन, ओम, स्वस्तिक, कलश, मेरे प्यारे भैया आदी नावे कोरलेल्या नवीन राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चांदीचा मुलामा दिलेल्या राख्या पन्नास ते दीडशे रुपयापर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. राजस्थानी लुंबा राखीला महिला वर्गातून मोठी पसंती मिळत असल्याचे राखी विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

इडली, डोसा, ढोकळा उत्तप्पा, पाणीपुरी, आकाराच्या राख्याही उपलब्ध आहेत. विमान, घड्याळ विविध गाड्यांच्या आकारातील राख्या लक्ष वेधत आहेत. कार्टूनमध्ये मोटू पतलू, छोटा भीम, डोरेमॉन, टेडी बियर, हनुमान, संगीत आणि लायटिंग असलेल्या राख्यासोबत विविध प्रकारातील राख्यांनी येथील बाजारपेठा सजल्या आहेत.

चंद्रयान 3 राखी उपलब्ध

याचबरोबर राजस्थानी लुंबा, गोंडे मोतींनी गुंफलेल्या लटकन राख्या विक्रीस उपलब्ध असून तीस ते दीडशे रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून राख्या सोबतच चंद्रयान 3 रॉकेट येथील ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news