बेट भागात पावसाअभावी सोयाबीन संकटात | पुढारी

बेट भागात पावसाअभावी सोयाबीन संकटात

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर तालुक्यातील बेट भागात पावसाने हुलकावणी दिल्याने ऐन पावसाळ्यात शेतकर्‍यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक सुकू लागले आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर सध्याच्या कडक उन्हामुळे संकटात सापडलेले सोयाबीन पीक पूर्णपणे जळून जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जून, जुलै, ऑगस्ट हे पावसाचे महिने संपत आले असून, अद्यापी पुरेसा पाऊस पडलेला नाही. मात्र, पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली. रिमझिम पावसाच्या ओलीवर पीक उगवून आले. परंतु त्यानंतर जोरदार पाऊस झाला नाही.
पावसाने बराच काळ दडी मारल्याने आता हे सोयाबीन पीक सुकून करपण्याच्या मार्गावर आहे. सध्या आकाशात ढग, कडक उन्हाचा चटका आणि वाहणारे वारे यामुळे इतर पिकांचीही तीच अवस्था झाली आहे. पाऊस नसल्याने ऊस जनावरांच्या चारापिकांचे नियोजन करताना शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा :

निर्यात शुल्‍कानंतर बफर स्टॉकचा कांदा लवकरच बाजारात

कोल्हापूर: बाळूमामा पुण्यतिथी उत्सवाचा मान आदमापूरच्या भोसले कुटुंबियातील महिलांना: हायकोर्टाचा निकाल

 

Back to top button