March Sugar Quota Price Outlook: मार्चसाठी २२.५ लाख टन साखर कोटा; दर तेजीत राहण्याची शक्यता

उन्हाळा, लग्नसराई व शीतपेयांची वाढती मागणी; घाऊक बाजारात दरवाढीचे संकेत
Sugar
Sugar Pudhari
Published on
Updated on

पुणे: केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी 22 लाख 50 हजार मेट्रिक टन इतका साखरेचा कोटा खुला केलेला आहे. वाढता उन्हाळा, शीतपेय उत्पादकांची वाढणारी मागणी, यात्रा-जत्रा, लग्नसराईमुळे साखरेस वाढती मागणी अपेक्षित असून, घोषित केलेला कोटा मागणीच्या तुलनेत कमी असल्याची घाऊक बाजारपेठेची धारणा आहे. त्यामुळे पुढील महिन्यात साखरेचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला.

Sugar
Pune Cooperative Society Elections Restart: पुणे जिल्ह्यात १,१५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा सुरू

फेबुवारी महिन्यातील 28 दिवसांसाठी 22 लाख 50 हजार मेट्रिक टन इतकाच साखरेचा कोटा देण्यात आला होता, तर मार्च महिन्यातील 31 दिवसांसाठीही तेवढाच कोटा देण्यात आला असून, तो मागणीच्या तुलनेत कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्चसाठी किमान 23 लाख मे. टन इतका साखरेचा कोटा खुला होण्याचा अंदाज बाजारपेठेत होता. तो फोल ठरल्यामुळे मार्चमध्ये साखरेचे दर तेजीकडे झुकतील आणि वाढलेले दर स्थिरावतील, असे सांगण्यात आले.

Sugar
Pune Construction Air Quality Sensor Rule: पुण्यात मोठ्या बांधकामांवर एअर क्वालिटी सेन्सर बंधनकारक; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

सध्या कारखान्यांवर साखरेच्या निविदा प्रतिक्विंटलला 3,700 रुपयांवर जात आहेत. मार्च महिन्यातील नवीन निविदा उघडताच दर वाढण्याचा अंदाज बाजारपेठेला आहे. शिवाय सटोडियांकडून तेजीची हवा भरली जाण्याची अपेक्षा आहे. त्यातच मागणी वाढल्यास निश्चितच साखर दरवाढीस हातभार लागण्यास मदत होईल. दरम्यान, घाऊक बाजारात एस 30 ग््रेाड साखरेचा क्विंटलचा दर 4,000 ते 4,050 रुपयांवर सध्या स्थिर आहे.

Sugar
Pune Secondary Education Officer Irregularities: माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गंभीर अनियमिततेचे आरोप; चौकशीचे आदेश

देशात यंदा 293 लाख मे. टन साखर उत्पादन अपेक्षित

देशात दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी हंगामाच्या आरंभीस सुमारे 50 लाख मे. टन साखरेचा शिल्लक साठा होता. यंदा एकूण 324 लाख मे. टन साखर उत्पादनाचा अपेक्षित आहे. त्यापैकी 31 लाख टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविण्यात येईल. त्यातून प्रत्यक्षात साखरेचे उत्पादन 293 लाख मे. टन होण्याचा नवीन अंदाज आहे.

Sugar
Shikrapur Koyta Gang Assault Case: ‘आम्ही कोयता गॅंगचे आहोत’ म्हणत २० जणांचा हल्ला; शिक्रापूरमध्ये दोन भावांना मारहाण

म्हणजेच, प्रत्यक्षात 343 लाख मे. टन साखर उपलब्ध होईल. साखरेचा देशांतर्गत खप 283 लाख मे. टन इतका आहे. तसेच केंद्राने घोषित केलेल्या सुमारे 7 लाख मे. टन साखर निर्यात अपेक्षित आहे. हे पाहता हंगामअखेरीस 53 लाख मे. टन इतका साखरेचा शिलकी साठा राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news