Marathi Films OTT Platform Demand: ओटीटीवर मराठी चित्रपटांना दुय्यम वागणूक; स्वतंत्र प्लॅटफॉर्मची मागणी

350 चित्रपटांपैकी केवळ 20-25 ओटीटीवर; निर्मात्यांना कमी मानधन, राज्य सरकारकडून स्वतंत्र व्यासपीठाची मागणी
OTT Platform
OTT PlatformPudhari
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे: राज्यात दरवर्षी 350हून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात... पण, त्यातील फक्त 20 ते 25 चित्रपटांना ओटीटी व्यासपीठावर स्थान मिळत आहे, हो, हे सध्याचे वास्तव आहे. ओटीटीवर मराठी चित्रपटांना अतिशय थंड प्रतिसाद असून, येथे मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान दिले जात आहे. इतकेच नव्हे, तर मराठी चित्रपट निर्मात्यांना चित्रपटांचे दूरचित्रवाणी हक्क (सॅटेलाईट हक्क) विकण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

OTT Platform
Pune DJ Noise Controversy: पुण्यात ससून परिसरात ‘नो डीजे’ला हरताळ; उच्च न्यायालयात धाव घेणार

हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांना कोट्यवधी रुपयांचे मानधन तर मराठी चित्रपटांना अवघे सहा ते सात लाख रुपयांवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र ओटीटी व्यासपीठ सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

OTT Platform
Pune Road Naming Policy: पुण्यात अरुंद रस्त्यांना नावाऐवजी क्रमांक; महापालिकेचे नवे धोरण

गेल्या काही वर्षांत ओटीटीवर फक्त वेबसीरिज पाहणाराच नव्हे, तर चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग वाढला आहे. सध्या 25 ते 27 ओटीटी व्यासपीठ कार्यरत आहेत. मराठी चित्रपट निर्माते ओटीटी व्यासपीठांकडे चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी प्रस्तावही ठेवत आहेत. पण, कमी प्रेक्षक वर्ग, प्रभावित न करणारे चित्रपटाचे कथानक, मांडणी अशी वेगवेगळी कारणे देऊन मराठी चित्रपट या व्यासपीठांवर नाकारले जात आहेत.

OTT Platform
Pune Real Estate Price Rise: पुण्यात घरांचे दर 30% वाढले; मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी अवघड

याविषयी मराठी चित्रपट निर्माते शिरीष राणे म्हणाले, इंग््राजी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांना चांगला प्रेक्षक वर्ग आहे, ही आणि अशी विविध कारणे देत मराठी चित्रपट ओटीटीसाठी नाकारला जातो. माझ्या एका चित्रपटाच्या बाबतीत कमी पैसे आणि विविध कारणे देण्यात आली होती. मराठी चित्रपटांनाही या व्यासपीठावर स्थान मिळाले पाहिजे. जे ओटीटी व्यासपीठ आता कार्यरत आहेत, त्यांना दरवर्षी 25 मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा नियम केला पाहिजे.

राष्ट्रवादी काँग््रेासच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, ओटीटी व्यासपीठावर मराठी चित्रपटांना स्थान मिळणे ही काळाची गरज बनली आहे. ओटीटींनी मराठी चित्रपटांकडे गांभीर्याने पाहून, त्यासाठी स्वतंत्र बजेट आणि खरेदी धोरण तयार करणे आवश्यक आहे. दुसरीकडे ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मराठी निर्मात्यांनी कथा, पटकथा, तांत्रिक दर्जा आणि सादरीकरण या सर्व बाबींमध्ये सुधारणा केली पाहिजे. तेव्हाच ओटीटींना त्या चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि योग्य किंमत देण्याची प्रेरणा मिळेल.

OTT Platform
Chandoli Encroachment Protest: चांडोलीत दफनभूमीवरील अतिक्रमण जमीनदोस्त; भीमशक्तीचे ठोक आंदोलन

मराठी चित्रपट निर्मात्यांचे नुकसान

दाक्षिणात्य चित्रपटाला ओटीटीवर 45 लाखांच्या पुढील रक्कम दिली जाते. पण, ओटीटीवर मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तरी त्यासाठी फक्त पाच ते सात लाख रुपये मिळतात, तर शेअरिंग बेसेसवर चित्रपट विकला गेला तर 60 टक्के रक्कम ओटीटी कंपनीला आणि फक्त 40 टक्के रक्कम निर्मात्याला मिळते. त्यामुळे मराठी चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होत आहे.

सर्व ओटीटी कंपन्यांचे कार्यालय मुंबईत असूनही मराठी चित्रपट ओटीटीवर मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होताना दिसत नाहीत. मराठी निर्माते खूप मेहनत घेऊन आणि जोखीम पत्करून चित्रपटनिर्मिती करत आहेत. त्यांची इच्छा असते की, सर्वच माध्यमात चित्रपटाची चांगली कमाई व्हावी. पण, तसे होताना दिसत नाही. मराठी चित्रपटांनाही उभारी मिळावी, यासाठी राज्य सरकारने मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी व्यासपीठ सुरू करावे, ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत काय निर्णय होतो, याची वाट पाहत आहोत.

चंद्रकांत विसपुते, मराठी चित्रपट निर्माते आणि वितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news