Pune DJ Noise Controversy: पुण्यात ससून परिसरात ‘नो डीजे’ला हरताळ; उच्च न्यायालयात धाव घेणार

शांतता क्षेत्रात 124 डेसिबल आवाज; पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप, अवमान याचिकेची तयारी
DJ Court Case
DJ Court CasePudhari
Published on
Updated on

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‌‘नो डीजे‌’चा विधायक निर्णय घेतला असतानाही पुणे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे ससून रुग्णालय परिसरात डीजेचा थरकाप सुरू होता. या प्रकारामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी प्रशासनाचा तीव शब्दांत निषेध केला असून, या बेजबाबदारपणाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.

DJ Court Case
Pune Road Naming Policy: पुण्यात अरुंद रस्त्यांना नावाऐवजी क्रमांक; महापालिकेचे नवे धोरण

ससून रुग्णालय हे ‌‘शांतता क्षेत्र‌’

असतानाही या ठिकाणी चक्क 124 डेसिबल तीवतेने डीजे वाजत होते. राहुल डंबाळे यांनी यावर संताप व्यक्त करताना म्हटले की, आम्ही 12, 13 आणि 14 एप्रिल रोजी सलग तीन दिवस लेखी निवेदने देऊनही पोलिसांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होता.

DJ Court Case
Pune Real Estate Price Rise: पुण्यात घरांचे दर 30% वाढले; मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी अवघड

‌‘नो डीजे‌’ चळवळीला हरताळ

मध्यवर्ती जयंती समितीने यंदा ‌‘नो डीजे‌’चा निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून दिला होता. मात्र, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे काही मोजक्या घटकांनी या सुधारणावादी चळवळीला हरताळ फासला आहे. बाबासाहेबांचे विचार मांडण्याऐवजी आवाजाचा धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी मोकळे रान का दिले? असा सवाल डंबाळे यांनी उपस्थित केला आहे.

याचिका दाखल करणार

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेले स्पष्ट आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. सायलेन्स झोनमध्ये रुग्णांच्या प्रकृतीला धोका निर्माण करणाऱ्या या कृत्याकडे पोलिस डोळेझाक करीत आहेत. या सर्व प्रकरणाचे पुरावे आणि पोलिसांकडे केलेली तक्रार घेऊन आम्ही उच्च न्यायालयात ‌‘अवमान याचिका‌’ दाखल करणार आहोत, असे राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news