Pune Real Estate Price Rise: पुण्यात घरांचे दर 30% वाढले; मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी अवघड

जमिनीचे दर, बांधकाम खर्च आणि पायाभूत सुविधांमुळे घरांच्या किमतीत मोठी वाढ; रिअल इस्टेट क्षेत्राची झपाट्याने भरभराट
Real Estate
Real EstatePudhari
Published on
Updated on

दिगंबर दराडे

पुणे: शहरातील झपाट्याने वाढणारे जमिनीचे दर, बांधकाम साहित्याच्या किमतीतील सातत्याने होणारी वाढ आणि पायाभूत सुविधांचा वेगाने होत असलेला विस्तार यामुळे पुण्यात घर खरेदी करणे अधिकच महागडे बनले आहे. मागील तीन वर्षांत सदनिकांच्या सरासरी किमतींमध्ये तब्बल 30 टक्क्यांची वाढ झाल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी स्वतःचे घर घेणे अधिक आव्हानात्मक ठरत आहे.

Real Estate
Chandoli Encroachment Protest: चांडोलीत दफनभूमीवरील अतिक्रमण जमीनदोस्त; भीमशक्तीचे ठोक आंदोलन

पुण्याच्या बांधकाम क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये सुमारे 36 हजार कोटी रुपयांचा असलेला या क्षेत्राचा आकार 2024 पर्यंत वाढून 65 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत पुणे महानगर प्रदेशात सुमारे 44 हजार सदनिकांची विक्री झाली असून, त्यातून 32 हजार 800 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. सणासुदीच्या हंगामात घरांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Real Estate
Maharashtra Teacher Training 2026: नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण 4 मेपासून सुरू

दरम्यान, पुण्यातील कार्यालयीन (ऑफिस) क्षेत्रातही मोठी भरभराट होत आहे. देशात कार्यालयीन जागांच्या विक्रीत पुण्याचा पाचवा क्रमांक असून, शहराचे कार्यालयीन क्षेत्र 100 मिलियन चौरस फूट क्लबमध्ये दाखल झाले आहे. 2030 पर्यंत हे क्षेत्र 150 मिलियन चौरस फूटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत ऑफिस भाड्यांमध्ये सुमारे 8.8 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढून नागरिकांची खरेदी क्षमता वाढत आहे.

Real Estate
MHT CET Second Attempt Registration: MHT CET दुसऱ्या संधीसाठी 15-16 एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदतवाढ

यामुळेच घरांच्या मागणीत सातत्याने वाढ होत असून, किमतींवर त्याचा थेट परिणाम होत आहे. देशातील इतर महानगरांच्या तुलनेत पुण्यात अजूनही तुलनेने परवडणारी घरे उपलब्ध असली, तरी सध्याची दरवाढ लक्षात घेता आगामी काळात घरखरेदी अधिकच कठीण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाढीची ही आहेत कारणे...

  • बांधकाम साहित्याचे वाढलेले भाव

  • जमिनीच्या किमती सातत्याने

  • वाढत आहेत

  • नोकरी व करिअर संधी, शैक्षणिक संस्था

  • वाढते आयटी आणि औद्योगिक क्षेत्र

  • घराच्या खरेदीबाबत नागरिकांची बदललेली पसंती

  • महागड्या सदनिका घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे

  • आयटी व कार्यालयीन जागांची मागणी असल्याने खरेदीक्षमता वाढली

Real Estate
Pune Navale Bridge Accident: नवले पुलावर पुन्हा वाढला धोका; अपघातस्थळी अनधिकृत पार्किंग

पायाभूत सुविधांची उपलब्धता

  • आगामी विमानतळ, मेट्रो आणि चांगली कनेक्टिव्हिटी

  • परवडणाऱ्या घरांची उपलब्धता

  • शहरापासून जवळ असलेली पर्यटनस्थळे

  • चांगली जीवनशैली आणि मनोरंजनाचे विविध पर्याय

  • गेल्या काही वर्षांत झालेली उलाढाल

पुणे सर्वांत चांगले राहण्यासारखे शहर आहे. त्यामुळे लोक पुण्याला अधिक पसंती देत आहेत. शहरातील मेट्रो प्रकल्प, नवीन रस्ते, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा यामुळे विविध भागांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारत असून, त्या भागातील घरांच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. परिणामी, घरांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गजेंद्र पवार, बांधकाम व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news