Marathi Diwali Magazines: पुण्याचे दिवाळी अंक सातासमुद्रापार; २२ ते २३ देशांतील मराठी वाचकांपर्यंत पोहोचली साहित्याची मेजवानी

यंदा २५० ते ३०० अंकांची उपलब्धता; एआय चित्रे, ऑडिओ अंक आणि क्यूआर कोडमुळे डिजिटल तंत्रज्ञानाचीही जोड
Diwali Magazines
Diwali MagazinesPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांची चर्चा आता देशाच्या सीमा ओलांडून थेट परदेशात पोहचली आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणारे हे अंक परदेशात राहणाऱ्या मराठी वाचकांसाठीही दिवाळीचे खास आकर्षण ठरत आहेत. युरोपपासून अमेरिकेपर्यंत सगळीकडे पुण्यातून दिवाळी अंक पाठवले जात आहेत.

Diwali Magazines
Pune School Recognition Cancelled: सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या चार शाळांची मान्यता रद्द; १ मे २०२७ पासून निर्णय लागू

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, रशिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर आणि जर्मनी अशा विविध देशांमध्ये कुरिअरद्वारे अंक पाठवले जात असून, केवळ पारंपरिक साहित्यापुरते मर्यादित न राहता यंदा विषयवैविध्य, विशेषांक आणि नवनवीन प्रयोगांनी अंकांचे स्वरूप अधिक समृद्ध झाले आहे. या अंकांच्या माध्यमातून परदेशातही मराठी साहित्याची परंपरा जपली जात आहे. एआयच्या साहाय्याने तयार केलेली चित्रे, ऑडिओ स्वरुपातील अंक आणि क्यूआर कोडद्वारे कथा-कविता ऐकण्याची सुविधा यामुळे दिवाळी अंकांनी डिजिटल युगाशीही नाते जोडले आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून अंकांची मागणी होत आहे.

Diwali Magazines
Pune Rabies Free: रेबिजमुक्त पुण्याच्या दिशेने महापालिकेची वाटचाल; तीन वर्षांत एकही मानवी मृत्यू नाही

याविषयी प्रकाशक घनश्याम पाटील म्हणाले, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि कॅनडा अशा विविध देशांमध्ये अंक पाठवत आहोत. आतापर्यंत २२ ते २३ देशांमध्ये दिवाळी अंक पाठविले आहेत. कुरिअरच्या माध्यमातून परदेशातील मराठी वाचकांपर्यंत अंक पोहोचविले जात असून, परदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळी अंकांतील चित्रांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रयोगही यंदा पाहायला मिळत आहेत. यंदा बालसाहित्यावरील दिवाळी अंकांची संख्याही मोठी आहे.

Diwali Magazines
Bhatghar Dam: भाटघर धरणाला अतिक्रमणांचा विळखा; बेकायदेशीर बांधकामे, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि वीजखांबांमुळे धोका

वैविध्यपूर्ण विषयांवरील दिवाळी अंकांचा यंदा ट्रेंड

यंदाच्या दिवाळी अंकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विषयांमधील वैविध्य. ग्रामीण जीवन, आरोग्य, संगीत, नृत्य, क्रीडा, साहित्य, कला-संस्कृती, आपली वारसास्थळे, ज्योतिष, छायाचित्र अन्‌ अगदी रहस्यकथांवर आधारित दिवाळी अंक उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक कथा, कविता आणि ललित लेखनासह काही अंक विशिष्ट विषयांना वाहिलेले आहेत. वन्यप्राणी, जंगल याविषयांसह सामाजिक संघर्षाचे वेगवेगळे पैलू मांडणारे अंक, आनंद आणि सकारात्मकतेचा शोध घेणारे अंकही पाहायला मिळत आहेत. प्राचीन शिल्पवैभव, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरांचा वेध घेणाऱ्या अंकांनाही पसंती मिळत आहे. त्यामुळे अंक केवळ मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान, माहिती आणि विचारांची समृद्ध मेजवानी देत आहेत.

Diwali Magazines
Shirkai Devi Temple: शिरकाईदेवी देवस्थानाला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

चित्रांच्या दुनियेत एआयची भरारी

दिवाळी अंकांच्या निर्मितीत आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. काही अंकांतील चित्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. लेखांच्या आशयाला पूरक चित्रे तयार करणे आणि विषय अधिक प्रभावीपणे वाचकांसमोर मांडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे पारंपरिक साहित्यनिर्मितीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, अंकांच्या दृश्यात्मक मांडणीतही वेगळेपणा अनुभवायला मिळत आहे.

यंदा नवीन आणि जुन्या मिळून सुमारे २५० ते ३०० दिवाळी अंक उपलब्ध झाले आहेत. विषयांमधील वैविध्यामुळे वाचकांना वेगवेगळ्या प्रकारचे अंक वाचण्याची संधी मिळत आहे. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर आणि दुबई येथेही अंक पाठविले आहेत. परदेशातूनही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रसिका राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.