Manorama Khedekar Arms License: मनोरमा खेडकर यांचा शस्त्र परवाना रद्द

गुन्हेगारी पार्श्वभूमी व खुलासा असमाधानकारक; पोलिस आयुक्तांचा कडक निर्णय
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पुणे: वादग््रास्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडेकरची आई मनोरमा खेडकर यांच्याकडील शस्त्र परवाना पोलिसांनी रद्द केला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुळशीतील धडवली गावातील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याच्या आरोपावरून मनोरमा खेडकरसह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे ग््राामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली होती.

Gun
Nira Kolvihire ZP Election: निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटात कमालीची शांतता

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोरमा खेडकरविरुद्ध 2024 मध्ये पौड पोलिस ठाण्यात शेतकऱ्याला पिस्तुलाच्या जोरावर धमकावल्याच्या आरोपावरून आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे. तसेच नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाणे आणि

Gun
Nasrapur Community Biogas Project: केळवडे येथे सामुदायिक बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन

चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात देखील विविध कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मनोरमा यांना तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली होती. सुरुवातीला अनेकदा नोटीस दिल्यावरही त्यांनी आपला खुलासा सादर केला नव्हता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोरमा यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मनोरमा यांनी आपला खुलासा सादर केला होता. त्यांचा खुलासा पोलिसांना समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी खेडकर यांनी आपल्या दिलेल्या जबाबात आपल्या जिवाला धोका असून, त्याला जबाबदार पोलिस आयुक्त राहतील. तसेच आपण याबाबत 26 जानेवारी रोजी संचलनाच्या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आयुक्तालयात आपले म्हणणे सादर करण्यासाठी मनोरमा यांना बोलावले असता, कॅमेरा आदी साहित्यासह मोठा फौजफाटा घेऊन त्या आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या.

Gun
Rajmata Jijau Jayanti: राजगड पायथ्याशी राजमाता जिजाऊ जयंती; मावळ्यांचा जनसागर

...म्हणून शस्त्र परवाना रद्द

पोलिस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मनोरमा यांनी सादर केलेल्या खुलाशाचे अवलोकन केले असता, तो समाधानकारक दिसून येत नाही. खेडकर यांचे वर्तन हे गुन्हेगारी वृत्तीचे व कायद्यास न जुमाननारे असून, भविष्यात मंजूर शस्त्राचा गैरवापर केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कुटुंबातील व्यक्ती, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवानाविषयक अटी शर्तीचा भंग करण्याची दाट शक्यता असून, तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही, अशी आमची खात्री झाल्याने शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

Gun
Purandar Lift Irrigation: दिवे परिसरात पाणीटंचाईचे संकट; पुरंदर उपसा सिंचनाचे पाणी सोडण्याची मागणी

नुकताच घरी लुटीचा प्रकार

मनोरमा खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री लुटीचा प्रकार घडला. खेडकर यांच्या घरात दहा दिवसांपूर्वी कामाला आलेला नेपाळी स्वयंपाकी आणि साथीदारांनी बंगल्यात जबरी चोरी केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली. खेडकरच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध देण्यात आले. मध्यरात्री 1 च्या सुमारास पूजा खेडकर बंगल्यात आली, तेव्हा बेशुद्धावस्थेतील आई-वडिलांना तिने पाहिले. नेपाळी कामगाराने खेडकरचे हातपाय चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर कामगार आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दागिन्यांची लूट करून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पोलिसांनी स्वतः तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news