नसरापूर: केळवडे (ता. भोर) ग््राामपंचायत व ग््राामस्थांच्या पुढाकाराने सामुदायिक बायोगॅस प्रकल्प साकारत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी आदर्शवत आहे. यासाठी ग््राामस्थांबरोबर सरपंच, सदस्य व ग््राामअधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. या प्रकल्पामुळे केळवडे गाव विजेबाबत आत्मनिर्भर होणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिपादन केले.
केळवडे येथील बायोगॅस प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी मांडेकर बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, पुणे जिल्हा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, गणेश बागल, नंदू कोंडे, गणेश निगडे, विशाल कोंडे, संदीप कदम, माऊली पांगारे, सरपंच मनीषा भरत सोनवणे, उपसरपंच निर्मला सुनील कदम, ग््राामपंचायत अधिकारी संभाजी जगताप, सदस्या सुरेखा धनाजी कोंडे, प्रमिला पांडुरंग कुंभार, सोनम बाळासोा गव्हाणे, मंजूश्री सुहास कोंडे, पांडुरंग हनुमंत कोंडे, आकाश मच्छिंद्र कोंडे, विश्वास सुदाम मदने, विलास मरळ, भरत सोनवणे, धनाजी कोंडे उपस्थित होते.
फोरकॉस्ट ॲग््राोटेक इनोव्हेशनचे आशिष भोसले यांनी प्रकल्पाची माहिती दिली. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर यांच्या तंत्रज्ञानावर आधारित 1 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस व 5 टन प्रतिदिन क्षमतेचा स्लरी खतनिर्मितीचा हा प्रकल्प आहे.
त्यास 96 लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी गाव व परिसरातील सुमारे एक टन ओला कचरा दररोज लागणार आहे. दररोज साधारण 145 युनिट वीजनिर्मिती होईल. गावातील सार्वजनिक उपक्रमासाठी ती वापरली जाईल. यामधुन दररोज 5 टन प्रॉम व बायोस्लरी या खतांची निर्मिती होणार आहे. त्याच्या वापराबाबत ग््राामपंचायत निर्णय घेईल.
चोरघे व निकम यांचा सन्मान...
गावच्या हितासाठी जागा उपलब्ध करून देणारे बाळासाहेब चोरघे तसेच या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणारे तत्कालीन ग््राामपंचायत अधिकारी अभय निकम यांचा यावेळी हस्ते सत्कार करण्यात आला.