‌Malegaon Sugar Factory: ‘माळेगाव‌’चा अंतिम ऊसदर 3450 रुपये

अध्यक्ष अजित पवार यांनी ऊसदर जाहीर केला; सभासदांच्या खात्यावर उर्वरित रक्कम दोन दिवसांत, खोडवा उत्पादकांनाही लाभ
‌Malegaon Sugar Factory
‘माळेगाव‌’चा अंतिम ऊसदर 3450 रुपयेPudhari
Published on
Updated on

शिवनगर : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2024-25 मध्ये तुटून आलेल्या उसाला 3450 रुपये प्रति टन अंतिम ऊसदर जाहीर केला. संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि. 10) झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्षा संगीताताई कोकरे यांनी ऊसदर जाहीर केला. या वेळी सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.(Latest Pune News)

‌Malegaon Sugar Factory
Saswad Election: सासवडमध्ये धनुष्य पेलणार की कमळ फुलणार? नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगणार शिंदे विरुद्ध भाजप सामना

माळेगाव साखर कारखान्याने सदर ऊस बिलापोटी या अगोदर 3332 रुपये प्रति टन ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केले आहेत. आता उर्वरित 118 रुपये प्रतिटन दोन दिवसात सभासदांच्या बँक खात्यावर जमा होतील, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.

‌Malegaon Sugar Factory
Khadakwasla NDA: खडकवासल्यात 18 वर्षांच्या एनडीए कॅडेटने उचललं टोकाचं पाऊल, चौकशी समिती शोधणार कारण

दरम्यान कारखाना प्रशासनाने गेटकेन धारकांना 3200 रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला असून गेटकन धारकांनादेखील याअगोदर ऊस बिलापोटी 3125 रुपये प्रति टन दिले आहेत. उर्वरित 75 रुपये प्रति टन रक्कम त्यांच्या खात्यावर दोन दिवसात जमा होतील. दुसरीकडे कारखाना कामगारांना 20 टक्के बोनस जाहीर झाला असून, यामधील 15 टक्के बोनस दिवाळीसाठी व उर्वरित 5 टक्के बोनस मकर संक्रांती दरम्यान दिला जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.

‌Malegaon Sugar Factory
Nilesh Ghaywal: नीलेश-सचिन गायवळसह मकोका तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

खोडवा उत्पादकांना 150 रुपये प्रति टन

खोडवा ऊस उत्पादकांना 150 रुपये प्रति टन तर व्हरायटी उसासाठी 100 रुपये प्रति टन खत स्वरूपात अनुदान मिळणार आहे. एकूणच खोडवा ऊस उत्पादक सभासदांना 3600 रुपये प्रति टन तर व्हरायटी ऊस उत्पादकांना 3550 रुपये प्रति टन मिळतील.

‌Malegaon Sugar Factory
Agriculture Universities: कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त जागा भरण्यास मार्ग मोकळा, शिष्यवृत्तीसाठीही लवकर निर्णय

9 कोटी 36 लाखांची तरतूद

माळेगाव कारखाना प्रशासनाने ऊस बिलापोटी 11 कोटी 97 लाख रुपये, कामगारांच्या 15 टक्के बोनस रकमेसाठी 3 कोटी 81 लाख तर नुकतीच दिलेली ठेवीवरील व्याजाची रक्कम 3 कोटी 58 लाख अशी एकूण 19 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news