Mahavitaran Bribery Case: नवीन वीजमीटरसाठी दोन लाखांची लाच घेताना महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

देहू येथे रंगेहाथ कारवाई; ११ वीजमीटर जोडण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप
Bribery
BriberyPudhari
Published on
Updated on

पुणे: नवीन वीजमीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडून दोन लाख रुपयांची लाच घेताना महावितरणमधील वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. देहू गावात ही कारवाई झाली. गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, सध्या रा. मिडास रिजन्सी, देहू बायपास रस्ता, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

Bribery
Pune Lift Rescue: लिफ्टमध्ये अडकलेल्या पेपर विक्रेत्याची अग्निशमन दलाने केली सुटका

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. खेड तालुक्यातील येलवाडी गावात एका महिलेने एक गुंठा जमीन खरेदी केली होती. आरोपी चट्टे हा येलवाडी महावितरण कार्यालयात वायरमन आहे.

Bribery
Pune Crime: प्रेमसंबंधातून लग्नासाठी पैशांची मागणी; मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

महिलेने ठेकेदारामार्फत नवीन वीजमीटर बसविण्यासाठी ठेकेदारामार्फत महावितरणकडे ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर चट्टे हा ठेकेदाराला भेटला. या भागात ११ गुंठे जमीन आहे. येथे वीजमीटर बसविण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली होती.

Bribery
Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष; २५ हजारांहून अधिक इमारतींपैकी फक्त ४८९ संस्थांनीच अहवाल सादर केला

ठेकेदाराने याबाबत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणीनंतर देहू गावातील भैरवनाथ चौकात सापळा लावण्यात आला. तक्रारदार ठेकेदाराकडून ११ मीटर बसविण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या चट्टे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून पकडले.

Bribery
Maharashtra Ullas Navbharat Literacy Programme: ‘उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम’साठी राज्यभर समित्या स्थापन

चट्टे याला अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. सहायक आयुक्त भारती मोरे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news