Pune Lift Rescue: लिफ्टमध्ये अडकलेल्या पेपर विक्रेत्याची अग्निशमन दलाने केली सुटका

मोबाईलचा रिचार्ज संपल्याने मदतीसाठी संपर्कही शक्य नव्हता; १०१ वर फोन करताच जवान देवदूतासारखे धावले
Lift Rescue
Lift RescuePudhari
Published on
Updated on

पुणे: पहाटे स. ५.१५ ची वेळ. नेहमीप्रमाणे पेपर टाकण्यासाठी मंडई परिसरातील एका इमारतीचे त्‍यांनी लिफ्टचे बटन दाबले, लिफ्ट सुरू झाली, पण डकमध्येच लिफ्ट बंद पडली. त्‍यात मोबाईलचा रिचार्ज संपल्याने कुणाशी संपर्कही होईना. त्‍यांनी अनेक हाका मारल्या, पण त्‍यांना ना कुणाचा प्रतिसाद मिळाला ना मदत. अखेरचा प्रयत्‍न म्हणून त्‍यांनी १०१ डायल केला अन्‌ लगेच अग्निशमनचे जवान आले अन्‌ तब्बल पाऊण तासानंतर त्‍यांची लिफ्टमधून सुटका झाली.

Lift Rescue
Pune Crime: प्रेमसंबंधातून लग्नासाठी पैशांची मागणी; मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

ही आपबिती अनुभवली पेपर विक्रेते सागर धाडवे यांच्यावर. जिवावर बेतणाऱ्या प्रसंगातून सुटका केल्याबद्दल अग्निशमन दलाचे त्‍यांनी आभारही मानले. आपल्या जिवावर बेतणाऱ्या अनुभवाविषयी सांगताना धाडवे म्हणाले, की घरोघरी जाऊन पेपर वितरित करण्याचे माझे काम सकाळी भल्यापहाटेपासूनच सुरू होते. शनिवारी (दि. ६) पहाटे मंडई परिसरातील लक्ष्मी नारायण इमारतीत नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रांची चळत घेऊन निघालो होतो.

Lift Rescue
Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष; २५ हजारांहून अधिक इमारतींपैकी फक्त ४८९ संस्थांनीच अहवाल सादर केला

लिफ्टने वरच्या मजल्यावर जात असताना अचानक पहिल्या अन्‌ दुसऱ्या मजल्याच्या मधोमध डकमध्येच लिफ्ट बंद पडली. मदतीसाठी कुणाला बोलावे म्हणून मोबाईल लावून पाहतो, तर रिचार्ज संपल्याने कुणाशी संपर्कच होईना.

Lift Rescue
Maharashtra Ullas Navbharat Literacy Programme: ‘उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम’साठी राज्यभर समित्या स्थापन

अखेर इमारतीतील कुणी मदतीला येईल, यासाठी दारावर अनेक थापा मारल्या, आवाज देऊन पाहिला, पण सर्वच साखर झोपेत असल्याने कुणापर्यंतही ती हाक गेली नाही. जवळपास पाऊण तास आतमध्येच अडकून होतो. काय करावे काहीच सूचत नव्हते.

Lift Rescue
Pune Poisonous Liquor Case Police Investigation: विषारी दारू प्रकरणात पोलिस-आरोपी संपर्काचा संशय; १५० कॉल्सचा खुलासा

थोडा वेळ शांत बसलो अन्‌ १०१ नंबर डायल केला. नंबर डायल झाल्यानंतर तिकडून लगेच प्रतिसाद मिळाला. त्‍यांना मी अडकल्याचे सांगितले आणि त्‍वरित मदत करण्याचे आवाहन केले. थोड्याच वेळात कसबा अग्निशमन दलाचे जवान देवदूतासारखे धावून आले. प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी यांच्या नेतृत्‍वाखालील पथकाने अवघ्या ४ मिनिटांत माझी सुटका केली. घामाघूम अवस्थेत मी त्‍यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news