Pune Crime: प्रेमसंबंधातून लग्नासाठी पैशांची मागणी; मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नातेवाइकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा; कोरेगाव पार्क पोलिसांकडून तपास सुरू
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पुणे: प्रेमसंबंधांच्या कारणातून तरुणीच्या नातेवाइकांकडून लग्नासाठी होणारी पैशांची मागणी आणि मारहाण करत दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल भैरम काळे (वय २१, रा. हुडको कॉलनी, पाणी टाकीजवळ शिरूर, सध्या कोरेगाव पार्क सिग्नलच्या पदपथावर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

Assault
Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेकडे गंभीर दुर्लक्ष; २५ हजारांहून अधिक इमारतींपैकी फक्त ४८९ संस्थांनीच अहवाल सादर केला

याप्रकरणी तरुणाच्या ३२ वर्षीय बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी चैत्राली उर्फ चैतू चंदू भोसले, रोहित चंदू भोसले, रुषिकेश चंदू भोसले, कोला काळुराम काळे, परशान तुकाराम काळे (रा. सर्व मूळ गाव हुडको कॉलनी, सध्या कोरेगाव पार्क सिग्नलच्या पदपथावर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Assault
Maharashtra Ullas Navbharat Literacy Programme: ‘उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम’साठी राज्यभर समित्या स्थापन

ही घटना ३० मे ते १ जूनदरम्यानच्या कालावधीत कोरेगाव पार्क कल्याणीनगर चौक सिग्नल तसेच वढू बु., शिवलेवस्ती येथील ओढ्याच्या कडेला घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला तरुण विशाल काळेचे आरोपींच्या नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.

Assault
Pune Poisonous Liquor Case Police Investigation: विषारी दारू प्रकरणात पोलिस-आरोपी संपर्काचा संशय; १५० कॉल्सचा खुलासा

त्याच कारणातून आरोपींनी तरुणाकडे तरुणीसोबत लग्न करण्यासाठी पैशांची मागणी केली होती. तसेच त्याला मारहाण केली. सतत होणारा जाच आणि मानसिक त्रासाला कंटाळून विशालने वढू बुद्रुक येथील शिवलेवस्तीमधील ओढ्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन १ जून रोजी आत्महत्या केली.

Assault
Maharashtra Integrated Junior College Investigation: नीट प्रकरणानंतर इंटिग्रेटेड कनिष्ठ महाविद्यालयांची चौकशी सुरू

सुरुवातीला याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र हा प्रकार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अश्र्विनी वनवे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news