

पुणे : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत नटराज नाट्य कलामंडळ, बारामती या संस्थेच्या कर्ण या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
तर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वामन आख्यान या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि झाड जीवन फाऊंडेशनच्या भिरुड या नाटकाला तृतीय क्रमांक पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दिग्दर्शनासाठीचे प्रथम पारितोषिक विनीता जोशी (नाटक-कर्ण), द्वितीय पारितोषिक प्रा. शुभंकर वाघोले (नाटक-वामन आख्यान), तृतीय पारितोषिक प्रणव भोसले (नाटक-भिरुड) यांना तर प्रकाश योजनेसाठीचे प्रथम पारितोषिक चेतन ढवळे (नाटक-कर्ण), द्वितीय पारितोषिक निखिल मारणे (नाटक- आनंमठ, मिशन वंदे मातरम्), तृतीय पारितोषिक निखिल मारणे (नाटक-वामन आख्यान) यांना जाहीर झाला आहे.
नेपथ्यासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जयंत टोले (नाटक - आनंदमठ, मिशन वंदे मातरम्) द्वितीय पारितोषिक ऋतुजा बोठे (नाटक-वामन आख्यान), तृतीय पारितोषिक विशाल दुराफे (नाटक- लगबत) तर रंगभूषेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अरविंद सूर्या (नाटक-वामन आख्यान), द्वितीय पारितोषिक अरविंद सूर्या (नाटक-आनंदमठ, मिशन वंदे मातरम्) तृतीय पारितोषिक नरेंद्र वीर (नाटक- हृदयी संत फुलताना) यांनी पटकावले आहे. संगीत दिग्दर्शनासाठीचे प्रथम पारितोषिक अभिजित पटवर्धन (नाटक-वामन आख्यान), द्वितीय पारितोषिक भूषण भावसार (नाटक-कर्ण) तृतीय पारितोषिक अभिजीत इनामदार (नाटक - हृदयी संत फुलताना) यांना तर वेशभूषेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गायत्री चक्रदेव (नाटक- आनंदमठ मिशन वंदे मातरम्),
द्वितीय पारितोषिक प्रतिभा शेंडे (नाटक-कर्ण) तृतीय पारितोषिक दिक्षा कुळ्ये (नाटक- वामन आख्यान) यांना तर उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रणव भोसले (नाटक-भिरुड) व पल्लवी भालेकर (नाटक-गेला बाजार) यांना जाहीर झाले आहे. ६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत सदाशिव पेठेतील भरत नाट्य संशोधन मंदिरात प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. स्पर्धेत ३० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. श्रीपाद जोशी, श्रीनिवास एकसंबेकर आणि पुनम चांदोरकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.