Shalarth System Irregularities: राज्यातील ३,६२५ शाळांत मंजूर पदांपेक्षा ९,५०९ कर्मचारी अधिक; शिक्षण विभागाकडून खुलासा मागवला

शालार्थ प्रणालीतील त्रुटी आणि वेतन अनियमितता उघड; अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे आदेश
Shalarth ID Teachers
Shalarth ID TeachersPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शालार्थ प्रणालीतील त्रुटी आणि वेतनविषयक अनियमितता रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून, राज्यातील ३ हजार ६२५ शाळांमध्ये मंजूर पदांपेक्षा ९ हजार ५०९ कर्मचारी अधिक कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. तसेच, १ हजार २०६ शाळांमध्ये १ हजार ४८४ अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

Shalarth ID Teachers
Pune District Gender Ratio: पुणे जिल्ह्यात जन्मावेळचे लिंग गुणोत्तर घसरले; ग्रामीण भागात हजार मुलांमागे केवळ ८४४ मुली

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी यासंदर्भात राज्यातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांना निर्देश दिले आहेत. २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील आढाव्यानंतर हे आदेश दिले आहेत.

Shalarth ID Teachers
Ambegaon Potato Crop: आंबेगावात बटाटा उत्पादनाला रोगाचा फटका; वाढता खर्च, घटलेल्या उत्पादनामुळे शेतकरी चिंतेत

राज्यातील ६१२ शाळांमध्ये संचमान्यतेनुसार पदे मंजूर असतानाही कर्मचारी कार्यरत नसल्याचे, तर ३,६४२ शाळांमध्ये संचमान्यता आणि शालार्थमध्ये कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, ८४२ शाळांची संचमान्यता उपलब्ध नसतानाही तेथील कर्मचाऱ्यांची शालार्थमध्ये नोंद असल्याचे आढळले आहे. तब्बल १० हजार ६९५ कर्मचारी डीडीओ कोडपासून विलग असून, त्यांच्या सेवेसंदर्भात निर्णय प्रलंबित आहे.

Shalarth ID Teachers
Purandar Gavran Pavta: पुरंदरच्या गावरान पावट्याला राज्यभरातून मागणी; किलोला १५० रुपये भाव

दरम्यान, अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या नोंदी अद्ययावत करून १ एप्रिल २०२१ चा प्रारंभिक शिल्लक तपशील १५ नोव्हेंबरपूर्वी शालार्थ प्रणालीत नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

Shalarth ID Teachers
Walhe Tomato Price: टोमॅटोला २० किलोला अवघे १५० रुपये; वाल्ह्यात शेतकरी आर्थिक संकटात

तसेच, नोव्हेंबर २०२६ चे वेतन डिसेंबरमध्ये अदा करताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व प्रलंबित बाबींची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेला देण्याची दक्षताही घेण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.