Ready Reckoner Rates: रेडीरेकनर दरात वाढीची शक्यता; मालमत्तांच्या किमती वाढणार

राज्यात 5 ते 8 टक्के दरवाढीचा प्रस्ताव; घरखरेदी व मुद्रांक शुल्कावर परिणाम होणार
Growth
GrowthPudhari
Published on
Updated on

पुणे: लाडकी बहीण योजना, कृषिपंपांना वीजमाफी, लोकप्रिय योजना, जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना आदींसाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे.

Growth
PMPML App: पीएमपीएमएल बसमध्ये क्यूआर कोड; प्रवाशांसाठी डिजिटल सुविधा

त्यामुळे यंदा नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यात रेडीरेकनर अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात सरासरी 5 ते 8 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे.

Growth
Pune Passport Office: पुण्यात 4.70 लाख पासपोर्टचे वितरण; बाणेरमध्ये नवे केंद्र

नुकत्याच महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अजून तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. रेडीरेकनरचे दर वाढल्यास सदनिका आणि जमिनींच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे यंदा रेडीरेकनरमध्ये किती वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Growth
Pune Mayor Bungalow: महापौर बंगल्याच्या दुरुस्तीवर 45 लाखांची उधळपट्टी

राज्यात दरवर्षी एक एप्रिलला रेडीरेकनरचे अर्थात जमिनी, सदनिका, दुकाने आदींचे वार्षिक बाजारमूल्य दर लागू होतात. नोंदणी व मुद्रांक विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. या दरानुसार त्या रकमेवर नागरिकांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. तसेच, नोंदणी व मुद्रांक विभागाने तयार केलेले जमीन, सदनिकांचे दर इतर विभागही ग्राह्य धरतात.

Growth
Pune Inner Ring Road: पुण्यातील अंतर्गत रिंग रोड रखडला; भूसंपादनावरून वाद

सरासरी 3.89 टक्के वाढ होणार

31 मार्च रोजी रात्री उशिरा नोंदणी व मुद्रांक विभाग रेडीरेकनरचे दर जाहीर करतात. मागील वर्षी म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षासाठीसुद्धा राज्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी 3.89 टक्के इतकी वाढ केली होती. यंदा रेडीरेकनरच्या दरात राज्यात सरासरी 5 ते 8 टक्के वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती नगररचना व मूल्यांकन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news