Pune Mayor Bungalow: महापौर बंगल्याच्या दुरुस्तीवर 45 लाखांची उधळपट्टी

निविदा न काढता काम मंजूर; खर्चावरून पुणे महापालिकेत वाद
Money
MoneyPudhari
Published on
Updated on

पुणे: घोले रस्त्यावरील महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी विनानिविदा 45 लाख 91 हजारांची उधळपट्टी करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यावर संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली आहे. ‌‘तातडीची तरतूद‌’ वापरून केवळ तीन कोटेशन मागवून काम देण्याची ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

Money
Pune Inner Ring Road: पुण्यातील अंतर्गत रिंग रोड रखडला; भूसंपादनावरून वाद

शिवाजीनगर येथील पुणे महापालिकेच्या महापौरांच्या निवासस्थानाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी तब्बल 45 लाख 91 हजार 937 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर नवे महापौर या निवासस्थानी राहणार असल्याने नगरसचिव, मुख्य अभियंता (विद्युत) आणि भवन रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे निश्चित केली असून, ती तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Money
NHM Salary Delay: एनएचएम कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब; आरोग्यसेवांवर परिणामाची भीती

या कामामध्ये आतील-बाहेरील रंगकाम, लाकडी साहित्यावर पॉलिश, छपराची दुरुस्ती, फर्निचर नूतनीकरण आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती यांचा समावेश आहे. सुमारे 38.70 लाख रुपयांचे सर्वांत कमी दराचे कोटेशन धनकवडी येथील ठेकेदार मे. कमलेश सुभाष जडे यांनी दिले असून, त्यांची निवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जीएसटी आणि इतर खर्चांसह एकूण रक्कम 45.91 लाखांपर्यंत जाणार आहे. ‌‘पुणे मनपा वसाहतींची दुरुस्ती‌’ या शीर्षकाखालील निधी वापरला जाणार आहे. या अर्थसंकल्पीय तरतुदीत सुमारे 300 कोटी रुपये असून, त्यातील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास वित्तीय समितीची मंजुरी आधीच मिळालेली आहे. मात्र, निविदा न काढता तातडीच्या तरतुदीअंतर्गत हे काम दिले जात असल्याने महापालिका वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Money
Pune Airport Expansion: पुणे विमानतळाचा विस्तार; उन्हाळी वेळापत्रकात 15 नवीन स्लॉट

भवन रचना विभागाकडून निविदाप्रक्रिया टाळली

भवन रचना विभागाकडून या कामासाठी कोणतीही निविदा मागविण्यात आलेली नाही. महापौर निवासस्थानाची देखभाल यापूर्वीपासून घोले रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फतच केली जात असल्याने थेट कोटेशनने काम दिले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महापौर बंगल्यात राहणार का ?

गेल्या बारा वर्षांत महापौर बंगल्यात अद्याप एकही महापौर राहण्यास गेलेले नाहीत. केवळ महापौर बंगला कार्यकर्त्यांच्या उठबैठकीसाठी वापरला जातो. त्यामुळे लाखो रुपये खर्च केल्यानंतर विद्यमान महापौर या बंगल्यात राहण्यास जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महापौर मंजूषा नागुपरे यांना संपर्क साधला असता, त्या बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

Money
Pune University Issues Guidelines: चौथ्या वर्षाच्या पदवीसाठी पुणे विद्यापीठाची मार्गदर्शक सूचना जाहीर

गेल्या बारा वर्षांत महापौर बंगल्यात अद्याप एकही महापौर राहण्यास गेलेले नाहीत. केवळ महापौर बंगला कार्यकर्त्यांची उठ-बस यासाठीच वापरला जातो. दर वर्षी या बंगल्यावर खर्च केला जातो. महापौर राहण्यास जाणार नसतील, तर विनाकारण लाखोंचा खर्च का करावा, हा प्रश्न आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news