Online Rent Agreement Registration: ऑनलाईन भाडेकरार नोंदणी ठप्प, नागरिक त्रस्त

सकाळ पासून आधार पडताळणी होत नसल्यामुळे भाडेकराराची प्रक्रिया थांबली आहे.
UIDAI SITE DOWN
UIDAI SITE DOWNPudhari
Published on
Updated on

वडगाव शेरी: आज सकाळ पासून आधार (यूआयडीएआय) पडताळणी सेवा बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन भाडेकरार नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. भाडेकरार बंद असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे काम रखडली आहेत. दरम्यान, डिंसेबर-जानेवारी मध्ये पंधरा दिवस आधार पडताळणी बंद होते. महिन्याभरात दुसऱ्यांदा भाडेकरार यंत्रणा ठप्प झाल्याने. नागरिक त्रस्त झाले आहेत.

UIDAI SITE DOWN
Online Rent Agreement: राज्यात ऑनलाइन भाडेकरार नोंदणी ठप्प; नागरिकांचे कामकाज खोळंबले

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भाडेकरार १.९ आणि २.० वरून करता येतो. या संकेतस्थळावर भाडेकरू, जागा मालक आणि इतर माहिती भरावी लागते. नंतर, मुद्रांक शुल्क ऑनलाईन पध्दतीने ग्रास प्रणालीव्दारे भरता येते. त्यानंतर जागा मालक, भाडेकरू तसेच साक्षीदारांचे आधार पडताळणी करावी लागते. आधार पडताळणी नंतर भाडे करार रजिस्टर होतो.

UIDAI SITE DOWN
House Rent Refund: धुळे : ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ३६ सफाई कामगारांना मिळणार घरभाड्याचा फरक!

पण, आज सकाळ पासून आधार पडताळणी होत नसल्यामुळे भाडेकराराची प्रक्रिया थांबली आहे. महसूल विभागाकडून डीआयटी आधार पडताळणीसाठीची तांत्रिक समन्वयाची जबाबदारी माहिती तंत्रज्ञान संचालनालय (डीआयटी) मुंबई यांच्याकडे असते. या खात्यामार्फत पाठवण्यात येणारी विनंती युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) प्रणालीकडे जाते. तेथे आधार ची पडताळणी झाल्यानंतर भाडेकरार नोंदणी पूर्ण होते. मात्र, हीच साखळी सध्या खंडित झाली आहे. यामुळे भाडेकरार पुर्णतः बंद झाली आहे. विविध महत्वाच्या कामासाठी भाडेकरार ची गरज असते. पण, भाडेकरार यंत्रणा ठप्प झाल्याने.यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.

UIDAI SITE DOWN
New Rent Agreement Penalty | नवीन भाडे करारात नोंदणी न केल्यास दंड

याबाबत अॅड सतिश माने यांनी सांगतिले की, ऑनलाईन भाडेकरार नागरिकांना घरातून करता येतो. त्यामुळे नागरिक ऑनलाईन भाडे करारला प्रधान्य देतात. पण, गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन भाडेकरार करताना अनेक अडचणी येत आहे. शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे संकेतस्थळ अनेकदा बंद असते.

UIDAI SITE DOWN
Flat Rent Deal Kidnapping | फ्लॅटच्या भाडे व्यवहारातून युवकाचे अपहरण

आज सकाळ पासून आधार पडताळणी होत नाही. त्यामुळे नागरिकांची काम रखडली आहे. नागरिकांना समस्या बाबत हेल्पलाईन किंवा मेलवर संपर्क साधावा लागतो. तिथे समाधानकारक उत्तर मिळत नाही. प्रशासनाने या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त ऑनलाइन सुविधांचा लाभ घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news