

पुणे: रविवारी ३० नोव्हेंबर पर्यंत राज्यात उबदार वातावरण राहणार असून १ डिसेंबर पासून मात्र गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.दरम्यान बंगालच्या उपसागरातील दीतवाह चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात पाऊस सुरु झाला आहे.
गत पाच दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली होती.पारा १० वरुन १५ ते १८ अंशावर गेल्याने सायंकाळ ते रात्री १० पर्यंत उबदार वातावरण होते.उत्तररात्री पहाटे ६ पर्यंत गारठा आहे.
मात्र किमान तापमानात वाढ आहे.आता १ डिसेंबर पासून राज्यातील किमान तापानात मोठी घट होण्याचे संकेत आहेत.कारण बंगालच्या उपसागरातील चक्रावादळे शांत होत आहेत.दक्षिण भारतात पाऊस सुरु राहणार असला तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.
आता हळूवारपणे किमान तापमानात घट होवून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पारा १० ते ८ अंशाखाली जाण्याची शक्यता आहे.
शनिवारचे राज्याचे किमान तापमान...
गोंदिया ११, नागपूर १३.५, वर्धा १३.६, पुणे १५, अहिल्यानगर १५.३, जळगाव १७, महाबळेश्वर १४, मालेगाव १६, नाशिक १५.१, सातारा १६.१,कोल्हापूर १८.२