Maharashtra Librarians Salary: २५ वर्षे ज्ञानसेवा, तरीही तुटपुंजे मानधन; ग्रंथपालांची आर्थिक कोंडी

७ ते १६ हजारांवर गुजराण; तीन ते सहा महिने मानधन थकीत, कर्नाटकच्या धर्तीवर वेतनरचनेची मागणी
Library
LibraryPudhari
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे: राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयांमधील ग्रंथपालांना तुटपुंज्या वेतनावर ज्ञानसेवा बजावावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. २५ ते ३० वर्षे सेवा करूनही अनेक ग्रंथपालांना केवळ ७ ते १६ हजार रुपये मानधन मिळत असून, तीन ते सहा महिने तेही थकीत राहत आहे. वाढत्या महागाईत दैनंदिन गरजा भागविताना या ज्ञानसेवकांची आर्थिक कसरत सुरू असून, राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त त्यांच्या वेतनवाढीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. शासनाने लवकरात लवकर वेतनवाढ करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Library
Swabhimani Shetkari Sanghatana Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना दोन लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १२ ठराव मंजूर

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. १२) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दै. 'पुढारी'च्‍या प्रतिनिधीने ग्रंथपालांशी संवाद साधला. राज्यात सुमारे ११ हजार १५० सार्वजनिक ग्रंथालये असून, २० हजार ३२१ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी अंदाजे सात ते आठ हजार ग्रंथपाल आहेत. मात्र, ग्रंथालयांना अनुदानातील अनियमिततेचा फटका ग्रंथपालांच्या वेतनाला बसत आहे. सदर बाजार सार्वजनिक वाचनालयाचे (सोलापूर) ग्रंथपाल धोंडिराम जेऊरकर म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे. दीर्घकाळ सेवा करूनही वेतनात अपेक्षित वाढ झालेली नाही. शासनाचे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

Library
Indian Astronomers White Dwarf Discovery: अवघ्या ६ मिनिटांत एक फेरी; भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी शोधली दोन ‘मृत’ ताऱ्यांची विलक्षण जोडी

रहिमतपूर (सातारा) येथील हिंद नगर वाचनालय - ग्रंथालयाचे ग्रंथपाल संजय जंगम म्हणाले, अ दर्जाच्या ग्रंथालयात सुमारे ३० वर्षे सेवा करूनही केवळ आठ हजार रुपये वेतन मिळते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविताना मोठ्या आर्थिक अडचणी येतात. किमान २५ ते ३० हजार रुपये दरमहा वेतन आणि ते नियमित मिळावे.

कर्नाटकप्रमाणे वेतनरचना करावी

कर्नाटकात ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा २५ हजार रुपये वेतन आणि दरवर्षी १० टक्के वाढ मिळते. महाराष्ट्रातही अशा पद्धतीनेच वेतनरचना करण्यात यावी, असे राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले.

Library
Pune Minor Girl Conversion Case: लुधियानातील अल्पवयीन मुलीला पुण्यात आणून धर्मांतरासाठी दबाव; तरुणाविरुद्ध पोक्सोसह गुन्हा

...हे आहे ग्रंथालयांमधील ग्रंथपालांचे वेतन

  • अ वर्ग -

१) जिल्हास्तरीय - १६, ८००

२) तालुकास्तरीय - १२,०००

३) इतर ग्रंथालयातील - ८०००

  • ब वर्ग -

१) जिल्हास्तरीय - १२,०००

२) तालुकास्तरीय - ११, ६८०

३) इतर ग्रंथालयातील - ६,८८०

  • क वर्ग -

१) तालुकास्तरीय - ७, २००

२) इतर ग्रंथालयातील - ४,८००

ड वर्ग - ग्रंथपाल वेतन - २, २२३

जिल्हा 'अ' दर्जाच्या ग्रंथालयात २८ वर्षे सेवा करूनही शासनाकडून केवळ १६ हजार ८०० रुपये वेतन मिळते. संस्थेने काही वाढ केल्याने प्रत्यक्ष हातात सुमारे १८ हजार रुपये येतात. वाढत्या महागाईच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत कमी आहे.

सुरेखा नाईक, ग्रंथपाल, सांगली जिल्हा नगर वाचनालय

Library
Pune Police Cash Robbery Case: पुण्यात पोलिसांवर दरोड्याच्या कटाचा आरोप; महिला हवालदारासह दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

गेल्या २५ वर्षांपासून ग्रंथालयात सेवा बजावत असून, ग्रंथपालांसाठी आवश्यक उच्च शिक्षण घेतल्यानंतरही घरखर्च भागेल इतके उत्पन्न मिळत नाही. ग्रंथपाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गांभीर्याने सोडविणे गरजेचे आहे.

विनोद गायकवाड, ग्रंथपाल, कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय (बार्शी)

संघाने शासनाकडे ग्रंथालयांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सातत्याने मांडल्या आहेत. त्यामध्ये ४० टक्के अनुदानवाढीसह ग्रंथालय कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे ही प्रमुख मागणी आहे. ग्रंथालयांसह ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात.

सोपान पवार, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ

सार्वजनिक ग्रंथालयांतील ग्रंथपाल आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. शासनाने ज्ञानसेवकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

प्रसाद भडसावळे, ग्रंथलय चळवळीतील कार्यकर्ते (पुणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news