Land Registration Survey Policy: जमीन व्यवहारात मोठा बदल; ‘आधी मोजणी मग दस्तनोंदणी’ धोरण लागू होणार

जमिनीवरील वाद टाळण्यासाठी महसूल विभागाची त्रिसूत्री योजना; मोजणीनंतरच खरेदीखत आणि फेरफार नोंद
Land
LandPudhari
Published on
Updated on

पुणे: महसूल विभागाने जमीन व्यवहार पारदर्शक करण्यासाठी तसेच जमिनीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आधी मोजणी मग दस्तनोंदणी अशा पद्धतीची अंंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. येत्या दीड वर्षात संपूर्ण राज्यात या पद्धतीनुसार दस्तनोंदणी होणार आहे. त्यादृष्टीने महसूल विभागाने पावले उचलली आहेत.

Land
Balbharati English Textbook: बालभारतीच्या नव्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा नवा फॉर्म्युला

अनेकदा खरेदी खतामध्ये जमिनीचे वर्णन चुकीचे असल्याने किंवा प्रत्यक्ष जागेवर जमीन वेगळीच असल्याने मोठे वाद निर्माण होतात. तसेच जमिनीचा ताबा नसतानाही खरेदीचे व्यवहार होतात. प्रत्यक्षात ताबा घेतेवेळी खरेदीदाराच्या लक्षात येते की, आपली फसवणूक झाली आहे. खरेदीखत झाले, तरी सातबारा उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव येत नाही.

Land
Maharashtra Voter List Revision: मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान 114 भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

अशा सर्व प्रकारांना आळा बसावा, जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि वादविवाद टाळण्यासाठी महसूल विभागाने 'आधी मोजणी मग दस्तनोंदणी अन्‌ त्यानंतरच फेरफार अशा त्रिसूत्री पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यानुसार भूमि अभिलेख विभाग, नोंदणी विभागाकडून नियमावली निश्चित करण्यात येत आहे.

Land
Class 11 Admission 2026: अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर; 1.81 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश

...हे आहेत फायदे

  • खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द आणि अचूक क्षेत्रफळ निश्चित होत असल्याने मालकी हक्क आणि हद्दीवरून होणारे वाद कमी होतील.

  • खरेदीदार अन्‌ विक्रेते या दोघांनाही व्यवहाराच्या वेळी जमिनीच्या स्थितीची संपूर्ण माहिती मिळेल.

  • मोजणीनंतर खरेदीखत होत असल्याने सातबारा उतार्‍यावरील फेरफार नोंदी अचूक मोजणीच्या आधारावर त्वरित होतील.

  • अभिलेखातील नोंदी आणि जमिनीवरील प्रत्यक्ष स्थिती यात फरक राहणार नाही.

  • बँकांकडून जमिनीवर कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ होईल.

Land
RTI Information Rule: RTI अर्जात माहिती मागण्याचे कारण देण्याची सक्ती मागे; शासनाचा निर्णय स्वागतार्ह

...ही आहेत आव्हाने

  • खरेदीखतापूर्वी मोजणी बंधनकारक केल्यास भूमि अभिलेख विभागाच्या मोजणी कामाचा भार प्रचंड वाढेल.

  • सध्याच मोजणीसाठी विलंब लागतो, या धोरणामुळे ही प्रतीक्षा अधिक वाढू शकते.

  • मागणीनुसार वेळेत मोजणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि आधुनिक उपकरणांची कमतरता जाणवू शकते.

  • जुन्या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले नसलेल्या ठिकाणी अचूक मोजणी करण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

  • काही तातडीच्या व्यवहारांना विलंब एखादा व्यवहार तातडीने पूर्ण करायचा असल्यास, मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरिकांना थांबावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news