Jeevangaurav Award: महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार लीला चितळे आणि अरुण खोपकर यांना जाहीर

समाजकार्य, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील मान्यवरांचा १७ जानेवारीला सन्मान
Jeevangaurav Award
Jeevangaurav AwardPudhari
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीला चितळे (नागपूर) यांना 'समाजकार्य जीवनगौरव' पुरस्कार आणि दिग्दर्शक, लेखक अरुण खोपकर (मुंबई) यांना 'दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे.

Jeevangaurav Award
Mulshi Kesari Wrestling: मनीष रायते ठरला ‘मुळशी केसरी’चा मानकरी

तर, पश्चिम बंगाल येथील भारतीय विज्ञान आणि युक्तिवादी समितीचे सचिव मनीष राय चौधरी यांना 'डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती' पुरस्कार देण्यात येणार आहे. मासूम संस्था आणि साधना ट्रस्टच्या वतीने १७ जानेवारी रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

Jeevangaurav Award
Pune International Film Festival PIFF: ‘पिफ’मध्ये विविध देशांतील १४० चित्रपट पाहण्याची पर्वणी

'मुंबई येथील निखिलेश चित्रे यांना 'गॉगल लावलेला घोडा' या कथासंग्रहासाठी ग्रंथ पुरस्कार (ललित), सोलापूर येथील विनय नगरकर यांना 'वस्त्रगाथा' पुस्तकासाठी ग्रंथ पुरस्कार, पुण्यातील ऋत्विक व्यास यांना 'पाच मजली हॉस्पिटल' या नाट्यसंहितेसाठी रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार, गडचिरोली येथील प्रा. जावेद पाशा यांना सामाजिक कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार आणि पुण्यातील दत्ता देसाई यांना सामाजिक कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार देण्यात येणार आहे.

Jeevangaurav Award
Parth Pawar Mundhwa land case: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग असल्याचा आरोप

भारतातील आणि अमेरिकेतील पुरस्कार निवड समितीने ही निवड केली आहे,' अशी माहिती 'मासूम'च्या समन्वयक डॉ. मनीषा गुप्ते, मुकुंद टाकसाळे, डॉ. रमेश अवस्थी आणि विनोद शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'जीवनगौरव' पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती' पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह तसेच अन्य पुरस्कारांचे स्वरूप पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news