

पुणे : मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मुळशी केसरी कुस्ती स्पर्धेत इंदापूरचा मनीष रायते मुळशी केसरीचा मानकरी ठरला आहे. उभा स्पर्धेत इंदापूरचा सागर देवकाते याने उपविजेतेपद पटकावले, तर अविनाश गावडे (इंदापूर) तृतीय आणि अभिजित भोईर (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला. तसेच अमृता केसरीचा मानकरी भारत मदने (बारामती) ठरला, तर मुन्ना झुंजुरके (मुळशी) याने उपविजेतेपद मिळवले.
यावेळी “मुळशीरत्न पुरस्कार” सुमित–सुनीता कैलास दाभाडे, दर्शन दत्तात्रय काळभोर आणि पै. पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ यांना देण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार शंकर मांडेकर, सहपोलीस आयुक्त मनोज पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हिंदकेसरी अमोल बुचडे, रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचे राज्य संघटक उमेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, संस्थापक भास्कर मोहोळ, दत्ता काळभोर, सचिन मोहोळ आदींनी केले.
वजनगटानुसार स्पर्धेचा निकाल : ५७ किलो : स्वप्नील शेलार (बारामती) प्रथम, अथर्व गोळे (पिरंगुट) द्वितीय, ओम गायकवाड (हवेली) तृतीय, श्रेयस तनपुरे (हवेली) चतुर्थ. ६१ किलो : शिवराज पायगुडे (आगळंबे) प्रथम, ओंकार ताठे (भोर) द्वितीय, अभिषेक लिम्हण (वेल्हा) तृतीय, व्यंकटेश देशमुख (भूगाव) चतुर्थ. ६५ किलो : अमोल वालगुडे (वेल्हा) प्रथम, युवराज सातकर (मावळ) द्वितीय, उदयसिंह मोरे (कात्रज) तृतीय, शिवम महाले (मुळशी) चतुर्थ. ७० किलो : योगेश्वर तापकीर (हवेली) प्रथम, अभिजित शेडगे (वेल्हा) द्वितीय, श्रीकृष्ण राऊत (राजगड) तृतीय, कौशल हुलावले (मुळशी) चतुर्थ. ७४ किलो : नामदेव कोकाटे (इंदापूर) प्रथम, शुभम जाधव (दौंड) द्वितीय, विपुल थोरात (इंदापूर) तृतीय, चैतन्य पिंगळे (मुळशी) चतुर्थ.