

पुणे : राज्यात मंगळवारपासून थंडीची लाट सक्रिय झाली असून किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट झाली आहे.
बुधवारी देखील राज्यातील बहुतांश भाग गारठला होता अहिल्यानगर 7.4 तर पुण्याचे किमान तापमान 8.1 अंशावर खाली आले होते.
राज्यातील किमान तापमानात वेगाने घट होत असून पारा दहा वर्षाच्या खाली आला आहे प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात या भागात थंडीची जोरदार लाट सक्रिय झाली आहे ही लाट आगामी आठ दिवस सुरू राहणार असून दुपारी चार वाजेपासूनच गाठा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
अहिल्यानगर ७.५, पुणे ८.१, जळगाव ८,कोल्हापूर १४.६,महाबळेश्वर ११.६,मालेगाव ९.४ ,नाशिक ८.१,सातारा ११.६,सोलापूर १३.२, धाराशिव १२.६,छत्रपती संभाजीनगर १०.८,परभणी १०.५, बीड ९,अकोला १०.८,अमरावती ११.९, बुलढाणा १२.८, ब्रम्हपुरी १२,चंद्रपूर १२, गोंदिया ८.४,नागपूर ८,वाशीम ११.२, वर्धा ९.५