Maharashtra CET Registration 2026: सीईटी 2026 नोंदणीस 4 मार्चपर्यंत मुदतवाढ; सात अभ्यासक्रमांसाठी संधी

अपार आयडी व युडीआयडी अनिवार्य; 28 ते 30 एप्रिलदरम्यान परीक्षा
CET
CET Pudhari
Published on
Updated on

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (बीएचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग््रेाटेड)/एमसीए (इंटिग््रेाटेड) या सात अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीला 4 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

CET
SPPU PhD Admission: एसपीपीयूमधील पीएच.डी. रिक्त जागांसाठी अतिरिक्त प्रवेश फेरी

आत्तापर्यंत या सात अभ्यासक्रमांना 41 हजार 249 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. 2025 च्या बीएचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 1 हजार 436 व बीसीए/ बीबीए/ बीएमएस/ बीबीएम/ एमबीए (इंटिग््रेाटेड) / एमसीए (इंटिग््रेाटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये 1 लाख 12 हजार 926 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

CET
RTE Admission Maharashtra: आरटीई प्रवेश प्रक्रियेचा संथ प्रारंभ; पहिल्या दिवशी केवळ 400 अर्ज

या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील. उमेदवारांनी अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

CET
Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जनिवारण योजनेसाठी 52 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती संकलित

नोंदणीसाठी अपार आयडी व युडीआयडी...

या वर्षीपासून विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, तसेच त्यांची पडताळणी करणे करणे सहज शक्य व्हावे, यासाठी राज्य सामाईक प्रवेश कक्षाने सीईटी प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी ‌‘ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री‌’ (अपार) आयडी व दिव्यांग विद्यार्थ्यांना युनिक डिसॲबिलिटी आयडी (युडीआयडी ) आवश्यक केले आहे. विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये नोंदणी करताना अपार आयडी व युडीआयडीची नोंदणी करावी, यावरून विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे.

CET
Baramati Panchayat Samiti Chairman: बारामती पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस; तावरे, जगताप, पवार चर्चेत

ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचा अपार आयडी तयार केलेला नाही. त्यांनी तो डिजिलॉकरद्वारे तयार करावा. पण, ज्या विद्यार्थ्यांना काही तांत्रिक कारणामुळे जर अपार आयडी व युडीआयडी तयार करण्यात अडचणी येत असतील, तर त्यांना अपार आयडी व युडीआयडीशिवाय सीईटीचा प्रवेश अर्ज सादर करण्याची सुविधा सीईटी कक्षानी उपलब्ध करून दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news