SSC HSC Exam Timetable 2026: दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर!

राज्य मंडळाचा निर्णय — यंदा दोन्ही परीक्षा १८ मार्चपर्यंत संपणार; विद्यार्थ्यांसाठी वेळेवर निकाल आणि प्रवेश प्रक्रिया सोयीची
SSC HSC Exam Timetable 2026
SSC HSC Exam Timetable 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक तसेच लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक यंदा १३ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये कोणताही बदल न करता मंडळाने तेच वेळापत्रक अंतिम वेळापत्रक म्हणून जाहीर केले आहे. त्यानुसार १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडेल तर दहावीच्या परीक्षेसाठी २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. (Latest Pune News)

SSC HSC Exam Timetable 2026
Government Hostel: येरवडा शासकीय वसतिगृहात अराजक! तळीरामांचा अड्डा, घाणीने विद्यार्थ्यांचे जगणे बेचैन

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.

SSC HSC Exam Timetable 2026
Pune Pothole free Campaign: पुणे होणार खड्डेमुक्त!

परंतु, यंदा दोन महिने उशीरा म्हणजेच १३ ऑक्टोबरला दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये कोणताही बदल न करता राज्य मंडळाने ३१ ऑक्टोबरला अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि दहावीच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. संबंधित परीक्षांचा ऑनलाइन निकाल मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.

SSC HSC Exam Timetable 2026
Pune Narcotics Squad Reshuffle: नार्कोटिक्सवर पोलिस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन २०२६ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करून यंदा १८ मार्चपर्यंत दोन्ही परीक्षांचा शेवट करण्याचा मंडळाचा मानस असून, त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

SSC HSC Exam Timetable 2026
Pune Voter List Verification: पालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी सुरू

लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची लेखी परीक्षा

२० फेब्रुवारी ते १८ मार्च

श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी

बारावीची लेखी परीक्षा

१० फेब्रुवारी ते १८ मार्च

श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news