Pune Narcotics Squad Reshuffle: नार्कोटिक्सवर पोलिस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

दोन्ही पथकातील सर्व कर्मचाऱ्यांची उचलबांगडी; प्रभारी निरीक्षकांच्याही बदल्यांची शक्यता
Pune Narcotics Squad Reshuffle: नार्कोटिक्सवर पोलिस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
Pune Narcotics Squad Reshuffle: नार्कोटिक्सवर पोलिस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’Pudhari
Published on
Updated on

पुणे : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या दोन्ही नार्कोटिक्स (अमली पदार्थविरोधी) पथकातील सर्व कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे कारण दिले जात असले, तरी या बदल्यांबाबत मात्र वेगळीच चर्चा पोलिस दलात सुरू आहे. दोन्ही पथकांच्या ढेपाळलेल्या कामगिरीबरोबरच काही अर्थपूर्ण बाबी थेट पोलिस आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता तेथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची देखील शक्यता वर्तविली जात आहे. (Latest Pune News)

शहरात होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्याची प्रामुख्याने जबाबदारी दोन्ही अमली पदार्थविरोधी पथकावर आहे. या पथकात तीसपेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते, तर दुसरीकडे अमली पदार्थतस्करीबाबत अमितेश कुमार यांची कठोर भूमिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात गांजा, मेफेड्रॉन आणि इतर अमली पदार्थांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या शहरातील कॉलेज परिसर, हॉस्टेल्स आणि उच्चभ्रू भागांमध्ये ड्रगचे जाळे झपाट्याने पसरत आहे. तरुणाईपर्यंत या व्यसनाचा शिरकाव होत असल्याने सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थविरोधी पथकावर जबाबदारी अधिक आहे. गुन्हे शाखेत अमली पदार्थविरोधी स्वतंत्र दोन पथके आहेत. त्यांच्या माध्यमातून केवळ अमली पदार्थांसंबंधी कारवाया केल्या जातात. मात्र, संथ कारवाया आणि वर्षानुवर्षे एकाच पथकात असलेल्या कर्मचाऱ्यांचा ‌‘संपर्क वाढल्याच्या‌’ कुजबुजीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून हे बदल केल्याची चर्चा आहे.

Pune Narcotics Squad Reshuffle: नार्कोटिक्सवर पोलिस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
Pune Voter List Verification: पालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी सुरू

दरम्यान, या कारवाईमुळे अमली पदार्थविरोधी विभाग सध्या अक्षरशः रिकामा झाला आहे. पथक एक आणि दोनमधील सर्व कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेतील इतर विभागांमध्ये हलविण्यात आले आहे. काही जणांना दरोडाविरोधी, खंडणी तर काहींना इतर पथकांत पाठविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला ‌‘नियमित फेरबदल‌’ म्हटले असले, तरी या माध्यमातून ‌‘स्वच्छतेचा संदेश‌’ दिला असल्याची चर्चा आहे.

Pune Narcotics Squad Reshuffle: नार्कोटिक्सवर पोलिस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’
Belsar ZP Election: ‘हायव्होल्टेज’ बेलसर गटात सर्वपक्षीय नेत्यांची कसोटी

पोलिस निरीक्षकही बदलणार?

अमली पदार्थविरोधी कारवायांना नवे बळ देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन पथकाची आखणी सुरू केल्याचे समजते. तसेच, सध्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, संबंधित पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक यांनाही बदलण्यात येणार असल्याचे समजते. मात्र, त्यावर अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news