Maharashtra Amrit Kalash : पुण्यात महाराष्ट्र अमृतकलश संकलन; भाजपचे अध्यक्ष नड्डा उपस्थित राहणार
पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातून 'मेरी माटी मेरा देश'अभियान राबविण्यात आले. यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) महाराष्ट्र आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांमार्फत राज्यातील महाविद्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आले. यामध्ये राज्यातील 22 विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.
या अमृतकलशाचे एकत्रीकरण 26 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल तसेच 22 विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रतिनिधीही उपस्थित असतील.
या अभियानांतर्गत हजारो हातांनी गोळा केलेली माती प्रतीकात्मक स्वरूपात अमृतकलशामधून जमा करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालयांमधील उपक्रमातून जमा झालेले अमृतकलश प्रातिनिधिक स्वरूपात जे. पी. नड्डा यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.
पुण्यात होणार्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार राजेश पांडे यांनी केले आहे.
हेही वाचा

