

पुणे : पुढारी वृत्तसेवा
खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडत्त, गंभीर दुखापत करणे, कट रचणे, जीवीतास धोका निमार्ण करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ओंकार उर्फ छोट्या सुनिल लोखंडे (25, रा. बिबवेवाडी आणि लोहीयानगर, गंजपेठ) या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.
दशरथ भिमा जोगदंड (25), प्रदिप धर्मा देवकुळे (26), कान्हा उर्फ रोहित भिमा जोगदंड (24, सर्व रा. बिबवेवाडी) यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली 76 कारवाई असून चालू वर्षातील ही 13 वी कारवाई आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जग्गन्नाथ कळसकर यांनी मोक्का अहवाल तयार केला होता. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत राजेंद्र डहाळे यांनी मोक्का कारवाईला मंजुरी दिली.