Pune Neighbours Fight: लव्हबर्ड आणि मांजराच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; प्रकरण पोलीस ठाण्यात

ताडीवाला रोड परिसरातील घटना; मारहाणीप्रकरणी बीएनएस कलमान्वये गुन्हा दाखल
Lovebird And Cat
Lovebird And CatPudhari
Published on
Updated on

पुणे: ‘पुणे तेथे काय उणे‌’ असे म्हणतात ते उगाच नाही. शहरात एखादी किरकोळ घटना कधी मोठ्या वादात रूपांतरित होईल, याचा नेम नाही. पुण्यात घडलेल्या अशाच एका वेगळ्याच प्रकाराने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लव्हबर्ड (पोपट) आणि मांजर यांच्यातील ‌‘वाद‌’ अखेर दोन शेजाऱ्यांमधील हाणामारीपर्यंत पोहोचला आणि प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेले.

Lovebird And Cat
Shaniwar Wada Fire: १९८ वर्षांनंतर शनिवारवाड्याला पुन्हा आगीच्या झळा; सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना ताडीवाला रोड परिसरातील भारत मित्रमंडळासमोर 8 मार्चला घडली. याप्रकरणी मांजर पाळणारे शेजारी दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात बीएनएसचे कलम 118 (1) नुसार गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lovebird And Cat
Maize Distribution Ration Card: शिधापत्रिकांवर आता मक्याचे वाटप; 14 जिल्ह्यांत निर्णय लागू

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक सिंग हे कुटुंबासह ताडीवाला रोड परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी घरात लव्हबड्‌‍र्स (छोटे पोपट) पाळले असून, त्यांचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. शेजारी राहणारे दिनेश पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे.

Lovebird And Cat
‌Pradhan Mantri Awas Yojana Pune: ‘प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेचा लाभ घ्यावा‌’

हे मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ते वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन लव्हबड्‌‍र्सच्या पिंजऱ्याभोवती फिरत असे. काही वेळा मांजरीने पिंजरा ढकलल्याचाही प्रकार घडल्याने सिंग कुटुंबीय त्रस्त झाले होते.

Lovebird And Cat
Pune Water Meter Issue: पुण्यात 42.98% पाणीमीटर नादुरुस्त; पाणीपट्टी वसुलीवर परिणाम

याबाबत त्यांनी पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मात्र, याच कारणावरून दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि काही वेळांतच दोन्ही कुटुंबीय रस्त्यावर आले. एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाली. घटनेनंतर अभिषेक सिंग यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news