Lohgaon Fake Police Case: ‘आय लव्ह यू, पुणे पोलिस’च्या कौतुकातच लोहगावातील धक्कादायक प्रकार; तोतया पोलिसाकडून अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण?

पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी देत मारहाणीचा आरोप; दुचाकीवरील ‘पोलिस’ लोगोचीही चौकशी, सीसीटीव्ही तपास सुरू
Fake Police
Fake PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: एकीकडे दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित बळाच्या वापराची चर्चा देशभर सुरू असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्र पोलिस आणि विशेषतः पुणे पोलिसांविषयी सामाजिक माध्यमांवर 'आय लव्ह यू, पुणे पोलिस' असे कौतुकाचे संदेश मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. नागरिकाभिमुख कामकाजामुळे पुणे पोलिसांची प्रतिमा उंचावत असतानाच, लोहगावमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण करून स्वतःला पोलिस असल्याची बतावणी करीत पोलिस ठाण्यात नेण्याची व गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Fake Police
Pune Green Waste Processing Scam Allegation: हरित कचरा प्रक्रियेत ३८ कोटींचा घोटाळ्याचा आरोप; पुणे महापालिकेच्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह

तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थी मित्राच्या घरून मोपेडवरून घरी परतत होता. डी. वाय. पाटील चौकाजवळील पुणेरी बिर्याणी हॉटेलसमोर रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा शिडकावा समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारावर उडाला. विद्यार्थ्याने तत्काळ त्यांची माफी मागून पुढे मार्गक्रमण केले.

Fake Police
Pune MNGL PNG Connections: पुणेकरांना मिळणार वेगवान गॅस कनेक्शन; एमएनजीएल दररोज देणार ८०० पीएनजी जोडण्या

मात्र, काही अंतरावर राजरत्न हॉटेलसमोर संबंधित दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याचा पाठलाग करून त्याचा रस्ता अडविला. त्यानंतर शिवीगाळ करत विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावून चेहऱ्यावर ठोसे मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विद्यार्थी वडिलांना बोलावतो, असे सांगताच, 'बापाच्या जीवावर फिरतोस का? चल, पोलिस स्टेशनला... तुला दाखवतो,' अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Fake Police
Hepatitis In Maharashtra: हेपेटायटिसचा छुपा धोका; महाराष्ट्रात दीड टक्क्यांपर्यंत नागरिक संसर्गाच्या विळख्यात

घरी परतल्यानंतर विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर दोघांनी लोहगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत आरोपीचे वय सुमारे ३५ ते ४० वर्षे असल्याचे नमूद केले आहे. त्याने काळ्या रंगाचे हेल्मेट, काळे जॅकेट आणि खाकी रंगाची पँट परिधान केली होती. विशेष म्हणजे, त्याच्या दुचाकीच्या क्रमांक फलकामागे 'पोलिस' असा लोगो लावलेला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Fake Police
Pune Railway Station Water Bottle Sale: पुणे रेल्वेस्थानकावर ‘रेल नीर’ला बगल? इतर ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्रास विक्री

या तक्रारीच्या आधारे लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी सुरू केली आहे. संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पोलिस कर्मचारी आहे की पोलिस असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांना धमकावत होता, याचा तपास सुरू असून, तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news