वीजबिल रोख भरण्यावर मर्यादा

वीजबिल रोख भरण्यावर मर्यादा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहे. त्यामुळे सुरक्षित व सुविधाजन्य ऑनलाइन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी 31 मार्च 2023 नुसार दिलेल्या आदेशान्वये 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा राहणार आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ 5 हजार रुपयांपर्यंतचे वीजबिल भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषिवर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा 10 हजार एवढी राहणार आहे.

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www. mahadiscom. in या संकेतस्थळावर, तसेच महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या 0.25 टक्के (जास्तीत जास्त 500 रुपये) इतकी सवलतदेखील देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत महावितरणचे 110 लाख ग्राहक (65 टक्के) ऑनलाईन बिल भरतात. यातून दरमहा महावितरणला साधारणत: 2250 कोटी महसुलाची वसुली होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news