भीमाशंकर : घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद

भीमाशंकर : घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद
Published on: 
Updated on: 

भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आदिवासी भागातील पाटण परिसरातील म्हाळुंगे तर्फे आंबेगाव येथे मंगळवारी (दि. 1) सकाळी 10 वाजता रामचंद्र गणपत मसळे यांच्या घरात बिबट्या शिरल्याने घरातील माणसांची मोठी धांंदळ उडाली. या वेळी घरात त्यांंची पत्नी सुगंधा रामचंद्र मसळे व आई जिजाबाई गणपत मसळे यांनी प्रसंगावधान दाखवत कसाबसा जीव वाचवला. अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. घरात बिबट्या शिरल्याची आदिवासी भागातील ही पहिलीच घटना आहे.

बिबट्या घरात शिरल्याचे वन विभागाला कळविताच वन विभागाचे कर्मचारी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या जखमी होता. तो घरात अडचणीच्या जागेत जाऊन बसला होता. त्याला पकडण्याबाबत वरिष्ठांची परवानगी घेतल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता बेशुद्ध करून या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. आदिवासी भागात घरात बिबट्या शिरल्याने पाटण परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे वैद्यकीय चंदन सवाने, महेंद्र ढोरे, रेस्क्यू टीम, वनपाल प्रवीण लांघी, वनपाल ए. एन. सोनवणे, वनरक्षक ए. एच. घोडे, नीलेश विरणक, एन. टी. दळवी, एफ. के. काळे, सी. के. केदारी, एस. आर. सुपे, कांता भारमळ, वन विभागाचे कर्मचारी, शिवाजी धादवड, अशोक पेकारी, बाळू भोईर, लक्ष्मण मावळे आदींसह पाटण परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बिबट्याच्या दहशतीने मोठ्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात मोबाईल फोनला रेंज नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. हा बिबट्या आजारी असल्याने त्याच्यावर माणिकडोह बिबट निवारण केंद्रात उपचार करण्यात येणार आहेत.

एम. बी. गारगोटे, वन परिक्षेत्र अधिकारी

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news