

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणेकर प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर आता पीएमपी बसची फीडर सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेचा बुधवारी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या सेवेमुळे पुणेकर प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर थेट घरापर्यंत फीडर सेवा उपलब्ध होणार आहे. महामेट्रोकडून दुसर्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले. त्या मार्गांकरिता गेल्या अनेक दिवसांपासून फीडर सेवेचे नियोजन करण्याचे काम पीएमपी आणि मेट्रो अधिकार्यांकडून सुरू होते. त्यानुसार बुधवारी या सेवेचे उद्घाटन झाले.
ही सेवा गुरुवार (दि. 3) पासून सुरू होणार आहे. उद्घाटनावेळी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्रप्रताप सिंह,
मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मेट्रोचे वर्क्स संचालक अतुल गडगीळ, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मेट्रोचे सिस्टिम्स अँड ऑपरेशनचे संचालक विनोद अग्रवाल, मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे व अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित अधिकार्यांनी पीएमपीच्या वातानुकूलित एसी बसला हिरवा झेंडा दाखविला. पुणेकर प्रवाशांनी या फीडर सेवेचा जास्तीत जास्त वापर करून शहर वाहतूक कोंडीमुक्त करावे, असे आवाहन मेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा