Kyasanur Forest Disease Vaccine: माकड तापावर नियंत्रणासाठी स्वदेशी लस; मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू

आयसीएमआर-एनआयव्हीची मोठी यशोगाथा; पश्चिम घाटातील नागरिकांसाठी दिलासा
Kyasanur Forest Disease Vaccine
Kyasanur Forest Disease VaccinePudhari
Published on
Updated on

पुणे : पश्चिम घाट परिसरात आढळणाऱ्या माकड तापावर (क्यासानूर फॉरेस्ट डिसीज : केएफडी) नियंत्रण मिळविण्यासाठी स्वदेशी लस विकसित करण्यात आली आहे. तिच्या मानवी वैद्यकीय चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही लस तयार करण्यात आली आहे.

Kyasanur Forest Disease Vaccine
Ultra Processed Food India: ‘जेन झी’चा अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाकडे वाढता कल; लहान वयातच आजारांचा धोका

माकड ताप हा प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांतील पश्चिम घाट भागात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. गोचीड या परजीवी कीटकामार्फत हा विषाणू माकड, उंदीर आणि इतर छोटे सस्तन प्राणी यांच्यात पसरतो. बाधित गोचीड किंवा प्राण्यांच्या संपर्कातून तो माणसांमध्ये संक्रमित होतो. मात्र, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार थेट पसरत नाही.

Kyasanur Forest Disease Vaccine
BARC Spin Off Technology: बीएआरसी–एसपीपीयू करार; ‘आकृती केंद्रा’तून संशोधन तंत्रज्ञान थेट उद्योगात

कर्नाटकातील क्यासानूर जंगल परिसरात प्रथम हा आजार ओळखला गेल्याने त्याला हे नाव देण्यात आले. कर्नाटक सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या आयसीएमआरने लसविकासाचा प्रकल्प हाती घेतला. निष्क्रिय विषाणूवर आधारित दोन मात्रांची ही लस पूर्णतः स्वदेशी असून, दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्याची योजना आहे.

Kyasanur Forest Disease Vaccine
Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्राथमिक तपासणी

सीडीएससीओच्या मान्यतेनंतरच होणार मानवी चाचण्या

लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या आणि सुरक्षिततेशी संबंधित अभ्यास पूर्ण झाले असून, केंद्रीय औषध मानके नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) मान्यतेनंतर मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. पहिला टप्पा यशस्वी ठरल्यानंतर पुढील टप्प्यांतील चाचण्या राबविण्यात येणार आहेत. लस सुरक्षित व प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अंतिम वापरासाठी मसीडीएससीओफची मंजुरी घेतली जाईल. राज्य सरकारांच्या आरोग्यविषयक गरजांना प्रतिसाद देत संशोधनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यास आयसीएमआर प्रयत्नशील असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

Kyasanur Forest Disease Vaccine
Industry oriented education: उद्योगांच्या सान्निध्यात विद्यापीठे; पारंपरिक शिक्षणपद्धतीचा गाभा बदलणार

ही आहेत माकड तापाची लक्षणे...

माकड तापाच्या संक्रमणानंतर साधारण तीन ते आठ दिवसांत ताप, अंग थरथर कापणे, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या व पोटदुखी आदी लक्षणे दिसून येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news