BARC Spin Off Technology: बीएआरसी–एसपीपीयू करार; ‘आकृती केंद्रा’तून संशोधन तंत्रज्ञान थेट उद्योगात

स्पिन-ऑफ तंत्रज्ञान, स्टार्टअप्स व नवप्रवर्तकांसाठी नवे व्यासपीठ
BARC Spin Off Technology
BARC Spin Off TechnologyPudhari
Published on
Updated on

पुणे : भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी), मुंबई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू), पुणे यांच्यात बार्क स्पिन-ऑफ तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी, तसेच तंत्रज्ञान स्थापनेसाठी ‌‘आकृती केंद्र‌’ स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. हा करार नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडला.

BARC Spin Off Technology
Industry oriented education: उद्योगांच्या सान्निध्यात विद्यापीठे; पारंपरिक शिक्षणपद्धतीचा गाभा बदलणार

2009 पासून राबविण्यात येणारा प्रगत ज्ञान आणि ग्रामीण तंत्रज्ञान अंमलबजावणी कार्यक्रम हा शहरी व ग्रामीण भागातील तंत्रज्ञानातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. नवोपक्रम, उद्योजकता, तसेच व्यवसाय आणि तंत्रज्ञानाला चालना देणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असून, सर्व स्तरांतील व्यक्तींना त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक साधने, संसाधने व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

BARC Spin Off Technology
Daund Zilla Parishad Election: दौंडमध्ये चार आमदार घराण्यांची प्रतिष्ठा पणाला; निकालातून ठरणार राजकीय वारसा

आकृती केंद्र तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांचे प्रदर्शन, उद्योग तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रशिक्षण, उत्पादन आणि विपणनासाठी व्यावसायिकदृष्ट्‌‍या स्वयं-शाश्वत सुविधा म्हणून कार्य करणार आहे. या केंद्रामध्ये निवडक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश असून, ते विद्यार्थी, नवप्रवर्तक व स्टार्टअप्ससाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

BARC Spin Off Technology
Shirur Rural ZP Election: क्रॉस वोटिंगने धाकधूक वाढवली!

या सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि टीटी अँड सीडी, बीएआरसी अध्यक्ष डॅनियल बाबू पी. यांनी स्वाक्षरी केली. या वेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, एसपीपीयू आरपीएफचे सीईओ व एमडी, डॉ. अरविंद शाळिग्राम, आकृती ग््रुाप लीडर, टीटी अँड सीडी (बीएआरसी) - भारती ए. भालेराव, आकृती केंद्र एसपीपीयू समन्वयक डॉ. भावना उमरीकर, आयआयएलचे संचालक डॉ. देविदास गोल्हार आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news