Koregaon Bhima Vijay Stambh Security: कोरेगाव-भीमा विजयस्तंभ अभिवादनासाठी 6 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही मॉनिटरिंग, एनडीआरएफ-एसडीआरएफ पथके तैनात
Vijay Stambh
Vijay StambhPudhari
Published on
Updated on

पुणे: कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी तब्बल 6 हजार पोलिस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, आपत्कालीन घटना रोखण्यासह सीसीटीव्ही मॉनिटरिंगच्या माध्यमातून बारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी विशेष प्राधान्य दिल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते.

Vijay Stambh
Rajgad Wildlife Hunting: राजगड–पानशेत भागात दुर्मीळ चौसिंगा हरणाची शिकार; चार शिकारी अटकेत

पेरणे फाटा परिसरातील विजयस्तंभ सोहळ्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी 1 जानेवारीला दाखल होतात. त्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरपासूनच कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी दक्षता घेतली आहे. जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, विविध पथकांकडून सुरक्षिततेसाठी विशेष प्राधान्य दिले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात केली आहेत.

Vijay Stambh
Pune Civic Issues: महापालिका निवडणुकीत पर्यटन नव्हे, मूलभूत प्रश्नांवर भर द्या : पुणेकरांची अपेक्षा

जागोजागी पोलिस मदत केंद्र, वॉच टॉवर उभारले आहेत. त्यासोबतच सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायींच्या वाहन पार्किंगसाठी मोठ्या जागेची उपलब्धता केली आहे. वाहनतळापासून सार्वजनिक बसच्या माध्यमातून अनुयायींची विजयस्तंभापर्यंत ने-आणची सोय केली आहे. सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्राधान्य दिल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Vijay Stambh
Pune Traffic Speed: पुण्यात वाहतुकीचा वेग 10 टक्क्यांनी वाढला; 30 किमी प्रतितासचे लक्ष्य

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तगडा बंदोबस्त

नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला पुणे पोलिसांकडून शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरभरात तीन हजारांवर पोलिस अंमलदारांसह अधिकारी सुरक्षेसाठी सज्ज राहणार आहेत. त्यासोबत 800 वाहतूक अंमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अँड ड्राइव्ह पॉइंट केले आहेत. त्यानुसार बेशिस्त वाहनचालक, मद्यपी चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी वाहनजप्तीचीही कारवाई केली जाणार आहे.

Vijay Stambh
Pune Crime Statistics: पुणे शहरातील गुन्हेगारीचा वार्षिक आढावा; खून, ड्रग्ज, टोळ्यांवर मोठी कारवाई

..तर पब, हॉटेलविरुद्ध होणार कारवाई

राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून विविध नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. हॉटेल, पब, बारमालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अल्पवयीनांना मद्याची विक्री न करणे, वेळेचे बंधन पाळणे महत्त्वाचे आहे. तसेच, पबमधील संगीताचा आवाज इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही दक्षता घ्यावी. दरम्यान, खासगी पार्ट्यांसह स्थानिकांनी शाळा, महाविद्यालय हॉस्टेल, रुग्णालय परिसरात म्युझिकच्या आवाजाची मर्यादा बाळगणे बंधनकारक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news