Kondhwa Issues PMC Election: अरूंद रस्ते, कचरा, तुंबणारे ड्रेनेज मुळावर !

कोंढवा खुर्द–कौसरबाग परिसरातील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई व तुंबणाऱ्या ड्रेनेजमुळे नागरिक त्रस्त
Kondhwa Issues PMC Election
Kondhwa Issues PMC ElectionPudhari
Published on
Updated on

प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना पाणी, अरुंद रस्ते, ड्रेनेज लाइन, कचरा, वीज, अशा एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचा कर वेळेत भरूनही रहिवासी हक्काच्या मूलभूत सोयी- सुविधांपासून वंचित आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणांमुळे परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी अरुंद झाल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. व्यावसायिक आणि अनधिकृत पथारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Kondhwa Issues PMC Election
PMC Elections Ticket: धावपळ कशासाठी? पार्टीच्या तिकिटासाठी...

प्रभाग क्रमांक :19 कोंढवा खुर्द-कौसरबाग

सुरेश मोरे

याप्रभागात एक बाजूला दाट लोकवस्तीचा डोंगराळ भाग, तर दुसऱ्या बाजूस सपाट असलेल्या भागात अनेक सोसायट्या आहेत. कमेला, भीमनगर आणि राममंदिर या तीन झोपडपट्‌‍ट्या आहेत. मीठानगर, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर हा परिसर डोंंगराळ भागात आहे. अरुंद आणि तीव उताराचे रस्ते असल्यामुळे या भागात महापालिकेची वाहने जात नाहीत. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे करून परिसराची वाट लावली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेचे नियोजन फिसकटले आहे. तसेच वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या भागात अर्धा किंवा एक गुंठा जमिनींवर उंच इमारती बांधण्यात आल्या असून, त्यांना अनधिकृत नळजोडही देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Kondhwa Issues PMC Election
Prabhag 11 Election Politics Pune: प्रभाग 11 मध्ये राजकीय पेच : भाजपच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या भागात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे एकमेव आहे. या क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. जवळच असलेल्या कचरा डेपो परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा समान करावा लागत आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणांचा अभाव आहे. सामाजिक कार्यकर्ते देवदास लोणकर म्हणाले की, पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेज लाइन कामे अनियोजित आणि निकृष्ट दर्जाची झाली आहेत. काही ठिकाणी पावसाळी वाहिन्यांतून ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहताना दिसत आहे. तसेच वारंवार ड्रेनेज लाइन तुंबत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. लोकसंख्येनुसार पाणी पुरवठ्याचे व ड्रेनेजचे नियोजन नाही.

Kondhwa Issues PMC Election
Ward 11 Urban Issues Pune: नागरीकरणाला गती, सुविधांची अधोगती

प्रभागातील प्रमुख समस्या

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

वर्षभर जाणवणारी पाणी टंचाई

कचरा व्यवस्थापनाकडे होणारे दुर्लक्ष

परिसरात वारंवार तुंबणाऱ्या ड्रेनेज लाइन

खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था

अतिक्रमणे वाढल्याने अरुंद झालेले रस्ते

पार्किंग, सिग्नल व्यवस्थेचा आभाव

Kondhwa Issues PMC Election
Ajit Pawar : राष्ट्रीय स्पर्धेतील खर्चाची होणार चौकशी, ‘एमओए‌’च्या बैठकीत अजित पवार यांच्या सूचना

प्रभागात झालेली विकासकामे

उड्डाणपूल, अग्निशमन केंद्र

ई-लर्निंग शाळा, उर्दू माध्यमाची शाळा

क्रीडांगण, उद्याने

बहुउद्देशीय हॉल, अभ्यासिका

मनपा दवाखाना, डायलेसिस सेंटर

लाइट हाउस प्रकल्प

मानानीयांना या प्रश्नांची द्यावी लागतील उत्तरे

गेल्या काळात रस्त्यांवरील अतिक्रमणे का हटविली नाहीत?

मुख्य रस्त्यावर अनधिकृत भाजी मंडई कशी सुरू आहे?

वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार कधी?

डीपी रस्त्यांचा प्रश्न अद्यापही का रखडला आहे?

पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज लाइनच्या समस्या सुटणार कधी?

Kondhwa Issues PMC Election
Illegal Gun Arrest: पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक

प्रभागात उड्डाणपूल, अग्निशमन केंद्र, ई-लर्निंग शाळा, क्रीडांगण, बहुउद्देशीय हॉल, अभ्यासिका, डायलेसिस सेंटर, उद्याने, मनपा दवाखाना, उर्दू माध्यमाची शाळा, लाइट हाउस प्रकल्प, समाजमंदिर आदी प्रकल्प पूर्ण केले आहेत. महापालिकेकडून मिळालेल्या निधीतून नियोजनबद्ध विकास साधला आहे.

साईनाथ बाबर, माजी नगरसेवक

माँ. खदीजा (र.अ.) प्रसूतिगृह उभारण्यात आले. पंपिंग स्टेशनवर नवीन 75 एचपीचे पंप बसवण्यात आला आहे. सुसज्ज मल्टीस्पेशालिटी प्रसूतिगृह उभारण्याचे काम सुरू आहे. कै. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहामध्ये एक्सप्रेस पाण्याची लाइन टाकण्यात आली असून, सोनोग््रााफी मशिनची उपलब्धता केली आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर, भूमिगत केबल, पददिवे, पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज लाइन आदींची कामेही केली आहेत.

परवीन फिरोज शेख, माजी नगरसेविका

Kondhwa Issues PMC Election
Transformer Theft: पानशेत-डावजे विद्युत रोहित्रावर चोरी; लाखो रुपयांचे नुकसान

हजरत अब्दुल रहेमान ओटा मार्केट विकसित केले आहे. टीपू सुल्तान क्रीडांगण, कल्चरल ॲण्ड कम्युनिटी सेंटर आणि माता रमाई आंबेडकर महिला उद्योग केंद्राचे काम सुरू आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक आणि कमरअली दुर्वेश रहै चौकाचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्येही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण, नवीन जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनची कामेही करण्यात आली आहेत.

ॲड. गफूर पठाण, माजी नगरसेवक

सिविक कल्चरल अँड कम्युनिटी सेंटरचे काम सुरू आहे. 18 मीटर शिवनेरी डीपी रस्ता विकसित केला आहे. रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पंपिंग स्टेशनमध्ये 100 एचपीचे दोन नवीन पंप बसविण्यात आले आहेत. नुरानी कबस्तानमध्ये विविध विकासकामे करण्यात आली आहेत.

हामिदा सुंडके, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news