Pune Extortion Case: कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाला खंडणीचा धाक; 15 लाख उकळल्याचा आरोप

महापालिकेकडे खोट्या तक्रारी करून कारवाईची धमकी; 25 लाख आणि फ्लॅटची मागणी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
Extortion News
Extortion NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: कोंढवा परिसरातील एका बांधकाम प्रकरणात खंडणी, दमदाटी आणि महानगरपालिकेकडे खोट्या तक्रारी करून बांधकामावर कारवाई घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Extortion News
Pune International Airport: पुणे विमानतळावरून परदेश दौऱ्याला वेग; वर्षभरात 87 हजार प्रवाशांची वाढ

दरम्यान, तक्रारी न करण्यासाठी तसेच बांधकाम नियमित करून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे 25 लाख रुपये, तसेच एका सदनिकेची मागणी करून बांधकाम बंद पाडण्याचा धाक दाखवून 15 लाख रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.

Extortion News
Pune Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; आंबेगावातील थरारक घटना

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी शफी गुलजारखान पठाण, समीर शफी पठाण, साजिद हसन शेख आणि कमल नितीन खैरनार या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 36 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.

Extortion News
Pune Child Marriage Case: बालेवाडीत बालविवाह उधळला; नवरा मुलासह 35 जणांवर गुन्हा

फिर्यादी हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांनी 2024 मध्ये मौजे कोंढवा खुर्द येथे जागा आणि जुनी इमारत सुमारे 60 लाख रुपयांत खरेदी केली आहे. त्यानंतर त्यांनी तेथे नवीन बांधकाम सुरू केले होते. बांधकाम सुरू झाल्यानंतर आरोपी शफी पठाण यांनी “मला विचारल्याशिवाय या भागात कोणी बांधकाम करत नाही,” असे म्हणत दमदाटी केली.

Extortion News
Maharashtra FYJC Admission: अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ? राज्यातील 70 टक्के जागांसाठी नोंदणीच नाही

तसेच, पुणे महानगरपालिकेत तक्रार करून कारवाई करण्याची धमकी दिली. काही दिवसांनी महापालिकेने बांधकामावर कारवाई करून मोडतोड केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यानंतर आरोपींनी 25 लाख रुपये आणि एक 2 बीएचके फ्लॅट देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. फिर्यादीने भीतीपोटी वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण 15 लाख रुपये रोख आणि बँक व्यवहाराद्वारे दिल्याचा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news