Khed Police Action: गणेशोत्सवात खेड पोलिसांचा दणका; अवैध दारू विक्रीसह मटका-जुगारावर कारवाई

कनेरसर, कडधे, ठाकूर पिंपरीत छापे; चार जण ताब्यात, राजगुरुनगरात मटका-जुगारावरही धाड
Police
PolicePudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: गणेशोत्सव काळात खेड पोलिसांनी बुधवारी (दि १६ ) एकाच दिवशी अवैध दारू विक्री आणि मटका धंद्यावर मोठी कारवाई केली. कनेरसर, कडधे आणि ठाकुर पिंपरी येथे अवैध दारू विक्रीवर सापळा रचून धाड टाकली, तर राजगुरुनगर शहरात अवैध जुगार आणि मटका धंद्यावर छापा टाकला. गणेशोत्सव काळात झालेल्या या कारवाईमुळे नागरिकां मधुन समाधान व्यक्त होत आहे.

Police
Baramati Fake Police: ‘आम्ही पोलीस आहोत, तपासणी सुरू आहे’; बारामतीत बनावट पोलिसांकडून १.२५ लाखांचा ऐवज लंपास

खेड तालुक्यातील तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीचे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. कनेरसर, कडधे आणि ठाकुर पिंपरी येथे पोलिसांनी अचानक छापे टाकून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना लक्ष्य केले. या कारवाईत संबंधित ठिकाणांहून दारू जप्त करण्यात आली असून, दारू अड्डा चालविणाऱ्या ४ जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

Police
Pune Gauri Festival: ‘आली गौराई सोनपावलांनी...’; पुण्यात गौराईंच्या स्वागताची जय्यत तयारी

राजगुरुनगर शहरातही पोलिसांनी अवैध जुगार आणि मटका धंद्यावर छापा टाकला. गणेशोत्सव काळात शहरात मटका आणि जुगार यासारखे अवैध प्रकार वाढत असल्याच्या तक्रारींनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. छाप्यात संबंधित ठिकाणांहून जुगार सामग्री जप्त करण्यात आली आणि आरोपींविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

Police
Pune Ganeshotsav Decoration: कसबा पेठेत थरारक देखाव्यांची मेजवानी; ‘तुंबाड’पासून ‘बाबा अँटिव्हायरस’पर्यंत आकर्षण

खेड पोलिसांच्या या एकाच दिवसातील दोन्ही कारवाया नागरिकांसाठी दिलासादायक ठरल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कठोर भूमिकेचे स्वागत केले असून, गणेशोत्सव काळात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Police
Pune Traffic Wardens: पुण्यातील २५० चौकांत ५०० ट्रॅफिक वॉर्डन; महापालिका खर्च करणार १७ कोटी

पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी या बाबत सांगितले की, अवैध दारू विक्री आणि मटका धंदा या दोन्ही प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहील. कोणत्याही तक्रारींवर त्वरित कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news