Pune Traffic Wardens: पुण्यातील २५० चौकांत ५०० ट्रॅफिक वॉर्डन; महापालिका खर्च करणार १७ कोटी

वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी निर्णय; निविदेविना तातडीने काम देण्यावरून महापालिका वर्तुळात चर्चा
Traffic Wardens
Traffic WardensPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका क्षेत्रातील २५० चौकांमध्ये ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरासाठी तब्बल १७ कोटी ९ लाख रुपये इतका खर्च होणार असून, या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबविताच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७-३ (क) अंतर्गत तातडीची कार्यवाही करून हे काम करण्याच्या महापालिका आयुक्तांनी ठेवलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

Traffic Wardens
Pune Water Tank Collapse: पुण्यात ५० फूट उंच पाण्याची टाकी अचानक कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला जीवदान

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या निर्णयाची माहिती दिली. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून महापालिकेकडे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. वाहतूक पोलिस विभागाने सुचविलेल्या २४२ चौकांमध्ये प्रत्येकी दोन ट्रॅफिक वॉर्डन आणि एक वाहतूक पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याशिवाय बावधन वाहतूक विभागातील आठ चौकांसाठी १६ ट्रॅफिक वॉर्डनची आवश्यकता आहे. त्यामुळे एकूण २५० चौकांसाठी ५०० ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावे लागणार आहेत.

Traffic Wardens
Pune Ganeshotsav Social Media: एका क्लिकवर बाप्पाचे दर्शन; पुण्याचा गणेशोत्सव सोशल मीडियामुळे ‘ग्लोबल’

या कामासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाज पत्रकात १७ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. कामाचे पूर्वगणपत्रक १७ कोटी ८ लाख ९९ हजार ५६० रुपये इतके तयार करण्यात आले आहे. यापूर्वी हे काम बी-२ पद्धतीने तसेच सात दिवसांच्या अल्प मुदतीच्या निविदा प्रक्रियेतून करण्यास मान्यता देण्यात आली होती.

Traffic Wardens
Mahabhumi Stack: जमीन खरेदी-विक्री आता अधिक पारदर्शक; ‘महाभूमी स्टॅक’वर एकाच क्लिकमध्ये मिळणार मालमत्तेची माहिती

मात्र, निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता आणि कार्यादेश देण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठीच तातडीचे निकष दाखवून हे काम निविदा प्रक्रिया न राबवताच देण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Traffic Wardens
Pune FDA Food Safety Action: सणासुदीपूर्वी पुणे FDA ची धडक कारवाई; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित

संबंधित ठेकेदाराने सेवा शुल्कासह एका ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, उपलब्धता आणि मनुष्यबळ पुरविण्याची कार्यवाही यापूर्वी सुरक्षा विभागामार्फत करण्यात आली होती. त्यामुळे हे काम सुरक्षा विभागामार्फत करून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने चौकांवरील वाहतूक नियमन, कोंडी कमी करणे आणि नागरिकांची सुरक्षितता, यासाठी हे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news