Pune Ganeshotsav Decoration: कसबा पेठेत थरारक देखाव्यांची मेजवानी; ‘तुंबाड’पासून ‘बाबा अँटिव्हायरस’पर्यंत आकर्षण

जिवंत, हलते आणि सामाजिक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी; एआय-लाइटच्या संगमातून भविष्याची झलक
Pune Ganeshotsav Decoration
Pune Ganeshotsav DecorationPudhari
Published on
Updated on

नितीन पवार

कसबा पेठ: काही देखावे फक्त पाहायचे नसतात तर अनुभवायचे असतात. तुंबाडच्या गूढ, काळोख्या आणि थरारक वातावरणाची झलक. लहान मुलांसाठी जबरदस्त असलेले भयानक जंगल, तर बाबा अँटिव्हायरस, वीरभद्र अवतार हा जिवंत देखावा. वैकुंट वाट हा सामाजिक देखावा, असे नावीन्यपूर्ण देखावे कसबा, सोमवार, बुधवार या पेठ परिसरात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Pune Ganeshotsav Decoration
Pune Traffic Wardens: पुण्यातील २५० चौकांत ५०० ट्रॅफिक वॉर्डन; महापालिका खर्च करणार १७ कोटी

जनजागृती मंडळ ट्रस्ट

  • २२ जून १८९७ चापेकर बंधूंकडून गव्हर्नर रँडचा वध देखावा.

  • अध्यक्ष : माऊली शिंदे, सदस्य-विक्रांत दावलभक्त

  • स्थळ : कसबा पेठ, मेट्रो स्टेशनजवळ

Pune Ganeshotsav Decoration
Pune Water Tank Collapse: पुण्यात ५० फूट उंच पाण्याची टाकी अचानक कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला जीवदान

सोमवार पेठ गोसावीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ

  • 'बाबा अँटिव्हायरस' या संकल्पेनेवर आधारित हलता देखावा.

  • अध्यक्ष विश्वस्त समिती : कैलाश पाठक, अध्यक्ष उत्सव समिती : विजय परोळ

  • स्थळ : सोमवार पेठ, नरपतगिरी चौक

भारतमाता मित्रमंडळ

  • अमृतमहोत्सवी वर्ष, जिवंत देखावा स्वराज्य आख्यान, वारसा लोककलेचा अभिमान महाराष्ट्राचा.

  • अध्यक्ष : अजय शेडगे

  • उपाध्यक्ष : प्रसाद कदम

  • स्थळ : गणेश रोड, आरसीएम शाळेजवळ.

Pune Ganeshotsav Decoration
Pune Ganeshotsav Social Media: एका क्लिकवर बाप्पाचे दर्शन; पुण्याचा गणेशोत्सव सोशल मीडियामुळे ‘ग्लोबल’

उदय मित्र ट्रस्ट

  • लहान मुलांसाठी जबरदस्त देखावा. भयानक जंगल संकल्पनेवर आधारित देखावा.

  • अध्यक्ष : विलास कथलकर

  • सल्लागार : सुनील बोधे

  • स्थळ : आरसीएम शाळेजवळ, फडके हौद, कसबा पेठ

उंबऱ्या मारुती मंडळ

  • वीरभद्र अवतार हा जिवंत देखावा.

  • १५ कलाकारांसह सादर केला आहे. मंडळाचे १२३ व्या वर्षात पदार्पण.

  • १५ ऑगस्ट, दहीहंडी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणेश जयंती, वारकरी भोजन यांसारखे उपक्रम.

  • अध्यक्ष : श्रीरंग शिंगरे, उपाध्यक्ष : अविनाश भुजबळ, बाळासाहेब रेणुसे

  • कार्याध्यक्ष : आशिष घोडके

  • खजिनदार : सचिन कवडे

  • स्थळ : जुनी तपकीर गल्ली, बुधवार पेठ

अमर ज्योती मंडळ

  • जिवंत देखावा वैकुंट वाट

  • अध्यक्ष : नितीन परदेशी

  • उपाध्यक्ष : धनंजय आहेर

  • स्थळ : सोमवार पेठ, १५ ऑगस्ट चौक

Pune Ganeshotsav Decoration
Mahabhumi Stack: जमीन खरेदी-विक्री आता अधिक पारदर्शक; ‘महाभूमी स्टॅक’वर एकाच क्लिकमध्ये मिळणार मालमत्तेची माहिती

आवर्जून पाहावेत असे देखावे...

  • जिजामाता तरुण मंडळ - गणेश रोड, लाल महालसमोर

  • उदय मित्र ट्रस्ट-आरसीएम शाळेजवळ, फडके हौद, कसबा पेठ

  • सोमवार पेठ गोसावीपुरा सार्व. गणेश मंडळ-बाबा अँटिव्हायरस

  • उंबऱ्या मारुती मंडळ- जुनी तपकीर गल्ली, बुधवार पेठ

जिजामाता तरुण मंडळ

  • ‘तुंबाड’ चित्रपटावर आधारित हलता देखावा. तुंबाडच्या गूढ, काळोख्या आणि थरारक वातावरणाची झलक. देखाव्यातील सर्व पात्रे कागदापासून बनवलेली आहेत.

  • अध्यक्ष : योगेश गंगेकर, उपाध्यक्ष : सागर राठोड,

  • स्थळ : गणेश रोड, लाल महालसमोर

आनंद मंडळ ट्रस्ट

  • भविष्याचा वेध एआय आणि लाइटचा संगम... परंपरा जपा; पण तंत्रज्ञानाला घाबरू नका, तंत्रज्ञानाची आपल्या संस्कृतीला जोड द्या.

  • अध्यक्ष : प्रणव पाटील

  • स्थळ : कसबा पेठ, मेट्रो स्टेशनजवळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news