Pune Gauri Festival: ‘आली गौराई सोनपावलांनी...’; पुण्यात गौराईंच्या स्वागताची जय्यत तयारी

अनुराधा नक्षत्रावर आज गौरी आवाहन; शुक्रवारी पूजन, तर शनिवारी गौरी-गणेश मूर्तींचे विसर्जन
Gauri
GauriPudhari
Published on
Updated on

पुणे: गणरायाच्या आगमनाने घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरण रंगले आहे. घरोघरी गुरुवारी (दि.१७) गौराईंच्या आगमनाने हाच आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. 'आली गौराई सोनपावलांनी...' म्हणत अनुराधा नक्षत्रावर महिला-युवतींकडून घरोघरी गौरींचे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. गौरींच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी आणि मांगल्य नांदते, अशी श्रद्धा असल्याने गौरींच्या स्वागतासाठी महिला-युवतींनी खास तयारीही केली आहे. घराची स्वच्छता, आकर्षक सजावट, फुलांची आरास, मखर उभारणी, रांगोळीपासून नैवेद्याच्या तयारीपर्यंतची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. विद्युत रोषणाईने सजावटीला देखणे रूप प्राप्त झाले आहे.

Gauri
Pune Ganeshotsav Decoration: कसबा पेठेत थरारक देखाव्यांची मेजवानी; ‘तुंबाड’पासून ‘बाबा अँटिव्हायरस’पर्यंत आकर्षण

गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येणार आहे. त्यामुळे आपापल्या घरातील प्रथा, परंपरा आणि पद्धतीनुसार या कालावधीत गौरींचे आवाहन केले जाणार आहे. विविध कुटुंबांमध्ये गौरींच्या स्वरूपातही वेगळेपणा पाहायला मिळतो. काही घरांमध्ये खड्यांच्या, काही ठिकाणी मुखवट्यांच्या, तर काही कुटुंबांमध्ये उभ्या गौरींची स्थापना करण्याची परंपरा आहे.

Gauri
Pune Traffic Wardens: पुण्यातील २५० चौकांत ५०० ट्रॅफिक वॉर्डन; महापालिका खर्च करणार १७ कोटी

शुक्रवारी (दि. १८) गौरीपूजनाचा सोहळा रंगणार आहे. कुटुंबातील प्रथा-परंपरेनुसार गौरींचे पूजन करून त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य दाखविले जातील. शनिवारी (दि. १९) गौरी आणि श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. गौराईंच्या स्वागतासाठी बुधवारीच (दि. १६) अनेक घरांमध्ये सजावटीची लगबग सुरू होती. महिलांकडून मखर उभारणे, फुलांच्या माळांनी सजावट करणे, आकर्षक तोरणे लावणे, सुंदर रांगोळ्या काढणे, तसेच विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू होती.

Gauri
Pune Water Tank Collapse: पुण्यात ५० फूट उंच पाण्याची टाकी अचानक कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला जीवदान

घराघरांत गौराईंच्या आगमनाची आतुरता दिसून येत असून, सजावटीसोबतच नैवेद्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची तयारीही केली जात आहे. गौरींच्या आगमनानिमित्त अनेक घरांमध्ये हळदी-कुंकवाचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत. यासाठी महिलांनी वाणाचीही खरेदी केली आहे. गुरुवारी गौराईंचे सोनपावलांनी आगमन होताच गणेशोत्सवाच्या आनंदाला आणखी एक मंगलमय रंग चढणार आहे.

Gauri
Pune Ganeshotsav Social Media: एका क्लिकवर बाप्पाचे दर्शन; पुण्याचा गणेशोत्सव सोशल मीडियामुळे ‘ग्लोबल’

गौरीपूजनाचे दिवस

  • गौरी आवाहन - गुरुवारी (दि. १७) - अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल.

  • गौरी पूजन - शुक्रवारी (दि. १८) - नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावे.

  • गौरी विसर्जन - शनिवारी (दि. १९) - दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news