Khed Panchayat Samiti Election: खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी गौरी मुऱ्हे; उपसभापतीपदी दिलीप डूबे बिनविरोध

शिवसेनेचे बहुमत कायम; राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवड जाहीर, समर्थकांचा जल्लोष
Gauri Murhe Dilip Dube
Gauri Murhe Dilip DubePudhari
Published on: 
Updated on: 

राजगुरुनगर: खेड पंचायत समितीच्या सभापतीपदी उद्धव ठाकरे शिवसेनेचे गौरी चंदन मुऱ्हे आणि उपसभापतीपदी दिलीप राजाराम डूबे यांची बिनविरोध निवड झाली. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडी नंतर समर्थकांनी पंचायत समिती आवारात फटाके फोडून तसेच भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष साजरा केला.फेटे बांधुन आणि पारंपरिक वाजंत्री लावुन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Gauri Murhe Dilip Dube
Pune Farmer Debt Relief: पुणे जिल्ह्यात ५७ हजार शेतकरी कर्जमुक्त; पीडीसीसी बँकेला ४९६ कोटींची कर्जमाफी

मावळते सभापती विद्याताई मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांनी २१ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना सदस्य राजकीय सहलीला गेले होते. नवीन पदाधिकारी निवडी साठी प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी सोमवारी (दि ५) सदस्यांची विशेष बैठक आयोजित केली होती.

Gauri Murhe Dilip Dube
Purandar Sitaphal Price: पुरंदरच्या सीताफळाला बुरशीचा फटका; २० किलो कॅरेटला केवळ २०० ते १५०० रुपये

त्यात शिवसेनेकडून सभापती पदासाठी कु. गौरी मु-हे आणि उपसभापती पदासाठी दिलीप डूबे यांचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून श्रद्धा मांडेकर, दिनेश हांडे यांचे अर्ज दाखल झाले होते. निर्धारित वेळेत मांडेकर आणि हांडे यांनी माघार घेतली.त्यानंतर प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. सभागृहात शिवसेनेचे ९ असे बहुमत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि शिंदे शिवसेनेचे १ असे बलाबल आहे.

Gauri Murhe Dilip Dube
Baramati Heat: पश्चिम बारामतीत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; पाणीटंचाईची चिंता वाढली

मावळते सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश सावंत यांच्या सह सर्व सदस्य बैठकीला उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे गटनेते ॲड विजयसिंह शिंदे पाटील, सदस्या दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती आरगडे, बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, उपसभापती रणजीत गाडे, मारुती सातकर, विजयाताई शिंदे आदी मान्यवर आणि तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news