Khadakwasla Dam Water Stock: खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणीसाठा कमी; पाणी नियोजनाची मागणी

चार धरणांत ७९.७३ टक्के साठा शिल्लक; पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा राखून ठेवण्याची नागरिकांची मागणी
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात वेगाने घट सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टीएमसीपेक्षा अधिक म्हणजे जवळपास १९ टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात गंभीर पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याआधीच प्रशासनाने पिण्यासाठी पुरेसे पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Khadakwasla Dam
Mutual Consent Divorce: पिंपरी न्यायालयाकडून अवघ्या दोन सुनावण्यांत घटस्फोट मंजूर; सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी शिथिल

बुधवारी (दि.४) चार धरणांच्या साखळीत २३.२४ टीएमसी म्हणजे ७९.७३ टक्के साठा शिल्लक होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी धरण साखळीत २८.३४ टीएमसी म्हणजे ९७.२४ टक्के साठा होता. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये जवळपास शंभर टक्के पाणीसाठा असूनही जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्याने पुणे शहर व परिसरावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले होते.

Khadakwasla Dam
Hinjewadi Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांना दिलासा; ४५ मिनिटांत प्रवास पूर्ण

खडकवासला येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव दत्तात्रय कोल्हे म्हणाले, यंदा अल निनोमुळे खडकवासलाच्या पाणीसाठ्यावर थेट परिणाम झाला आहे. धरणांतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे कागदावर आराखडे तयार करण्याआधी धरणांतील प्रत्यक्ष पाणीउपसा व बाष्पीभवनामुळे होणारी घट याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिकांचे जीवन खडकवासला धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे पिण्यासाठी पुरेसे पाणी राखीव ठेवावे.

Khadakwasla Dam
Sugarcane Farmers Demands: ऊस उत्पादकांच्या मागण्यांचा केंद्राच्या अभ्यास समितीसमोर भडिमार; साखरेची एमएसपी ५० रुपये करण्याची मागणी

माजी उपमहापौर प्रसन्‍न जगताप म्हणाले, गेल्या महिन्यात १ नोव्हेंबर रोजी धरण साखळीत ९४ टक्के पाणी होते. महिनाभरात २५ टक्के पाणी कमी झाले. त्यामुळे ऑगस्टपर्यंत १० महिने पाणीवापराचे योग्य नियोजन करावे. अन्यथा, पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. पुणे पालिकेने दहा टक्के पाणीकपात केली आहे. त्यामुळे थोडीफार पाण्याची बचत होत असल्याचे खडकवासला धरणाचे शाखा अभियंता वीरेश राऊत यांनी सांगितले.

जलसंपदाकडे नाही नेमकी माहिती

खडकवासलासह चारही धरणांतून पिण्यासाठी तसेच शेती, हाॅटेल, रिसाॅर्ट, खासगी कंपन्या, फार्म हाऊस आदींसाठी थेट पाणी उपसा होत आहे. एकट्या खडकवासला धरणातून दोनशे ते तीनशे उद्योग, व्यावसायिक तसेच ग्रामपंचायती, शेती सिंचन संस्था आदींचा पाणीउपसा सुरू आहे. धरणातून किती पाणी उपसले जाते व त्यांची संख्या किती आहे, याची नेमकी माहिती जलसंपदा विभागाकडे नाही.

Khadakwasla Dam
Women In Marathi Theatre: मराठी रंगभूमीवर महिलांचा वाढता दबदबा; अभिनयासह पडद्यामागच्या जबाबदाऱ्याही समर्थपणे पेलताहेत

खडकवासलातून पिण्यासह शेतीसाठी पाणी

सध्या शेती व पिण्यासाठी पाणी सोडले जात असल्याने दरतासागणिक पाणीसाठ्यात घट सुरू आहे. ‌गतवर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. पाण्याची तूट वाढत असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सध्या पानशेत व वरसगावमधून प्रत्येकी ६००, तर टेमघर धरणातून२६० क्‍युसेक पाणी खडकवासला धरणात सोडले जात आहे. या तीन धरणांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या प्रमाणात खडकवासलातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडले जात आहे.

आजचा पाणीसाठा

  • खडकवासला १.१६ ५८.८८

  • पानशेत ८.१२ ७६.३१

  • वरसगाव १०.८६ ८४.७३

  • टेमघर ३.०९ ८३.३६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.