Hinjewadi Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांना दिलासा; ४५ मिनिटांत प्रवास पूर्ण

जिल्हा न्यायालय ते माण डेपो प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत; स्वारगेट ते हिंजवडी थेट कनेक्टिव्हिटीसाठी स्कायवॉकची सुविधा
Hinjewadi Shivajinagar Metro
Hinjewadi Shivajinagar MetroPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडीचा सर्वात मोठा फटका सहन करणाऱ्या औद्योगिक कर्मचारी आणि आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि रोजच्या प्रवाशांसाठी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सेवेमुळे जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) ते हिंजवडी या मार्गावरील प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. दैनिक ‘’पुढारी’’च्या टीमने या सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी या मार्गावरील प्रवासाची प्रत्यक्ष पाहणी करून या सेवांचा आणि स्थानकातील पायाभूत सुविधांची पाहणी केली.

Hinjewadi Shivajinagar Metro
Sugarcane Farmers Demands: ऊस उत्पादकांच्या मागण्यांचा केंद्राच्या अभ्यास समितीसमोर भडिमार; साखरेची एमएसपी ५० रुपये करण्याची मागणी

शिवाजीनगर आणि हिंजवडी जोडणाऱ्या या मेट्रो मार्गामुळे शहरातील हजारो आयटीयन्स आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रोजच्या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेतला आहे. एरवी रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे आणि सिग्नलच्या रांगेमुळे हिंजवडीला जाण्यासाठी दोन ते तीन तास वाया जात असत. मात्र, आता मेट्रोच्या वेगवान आणि विनाअडथळा सेवेमुळे वेळेची मोठी बचत होत आहे. अवघ्या ४५ मिनिटांत हिंजवडीच्या शेवटच्या टोकाला म्हणजेच माण डेपोपर्यंत पुण्यातून पोहोचता येत आहे आणि पुन्हा रिटर्न सुद्धा येता येत आहे.

Hinjewadi Shivajinagar Metro
Women In Marathi Theatre: मराठी रंगभूमीवर महिलांचा वाढता दबदबा; अभिनयासह पडद्यामागच्या जबाबदाऱ्याही समर्थपणे पेलताहेत

मेट्रो प्रशासनाच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी मार्गावरील एकूण २३ स्थानकांपैकी १७ स्थानके प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहेत. उर्वरित स्थानकांचे कामही अंतिम टप्प्यात असून तीदेखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. सर्व स्थानके पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. नव्याने उपलब्ध झालेल्या सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला असून, आयटीयन्सकडून या सेवेचे मोठे स्वागत होत आहे.

Hinjewadi Shivajinagar Metro
Pune University Student Protest: पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचा राडा; कुलगुरूंची गाडी अडवून ठिय्या आंदोलन

स्वारगेट ते हिंजवडी आता एकाच प्रवासात जोडले..!

स्वारगेटवरून सिव्हिल कोर्टकडे (जिल्हा न्यायालय) येणाऱ्या महामेट्रोच्या मेट्रो लाईनची थेट कनेक्टिव्हिटी हिंजवडी-शिवाजीनगर ‘’पुणेरी मेट्रो’’ला देण्यात आली आहे. यासाठी एक विशेष स्कायवॉक उभारण्यात आला आहे. हा स्कायवॉक महामेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानकातून थेट शिवाजीनगर (जिल्हा न्यायालय मेट्रोस्थानक) मेट्रोस्थानकाला जोडतो. ही सुविधा आता पुणेकर प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे स्वारगेटवरून निघाल्यानंतर सिव्हिल कोर्ट स्थानकात उतरून या स्कायवॉकद्वारे प्रवाशांना शिवाजीनगर येथून थेट हिंजवडीकडे जाणाऱ्या मेट्रो ट्रेन पकडणे सोपे झाले आहे. या स्कायवॉकमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, बदलत्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सोपी आणि विनासायास झाली आहे.

Hinjewadi Shivajinagar Metro
Pune Shivajinagar Bus Port: शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा होणार अत्याधुनिक बस पोर्टमध्ये विकास

महत्त्वाची माहिती..

  • हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला लागणारा प्रवासाचा कालावधी - ४५मि.

  • तिकीट - ६२ रू

  • एक रेक (तीन कोच डबे) प्रवासी क्षमता - ३ हजार प्रवासी

  • ट्रेनची वारंवारिता - दर १० मिनिटांना

रोज सकाळी हिंजवडी आयटी पार्कमध्ये जाणे म्हणजे एक युद्धासारखे असायचे. ट्रॅफिकमध्ये तासन् तास अडकून पडल्यामुळे मानसिक ताण आणि शारीरिक थकवा खूप वाढायचा. पण आता जिल्हा न्यायालय ते हिंजवडी प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत होत असल्यामुळे वेळेची मोठी बचत होत आहे. विशेषतः सिव्हिल कोर्ट स्थानकावरील स्कायवॉकमुळे गाडी बदलणे खूप सोपे आणि सोयीचे झाले आहे. आता ऑफिसला अगदी वेळेत आणि विनाताण पोहोचता येते. पुणेकरांसाठी ही मेट्रो सेवा खरोखरच एक ‘’लाइफलाइन’’ ठरत आहे.

अमित देशमुख, आयटी कर्मचारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.